नामांकित सि. ए. विजय बाबुराव अनपट यांची ऑस्ट्रेलियामध्ये फुल आयरन मॅन स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी.

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

वाई:- युवा उद्योजक आणि नामांकित सि.ए विजय बाबुराव अनपट यांनी जागतिक पातळीवर आपल्या जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाचा ठसा उमटवला आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियातील बसल्टन शहरात १ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित फुल आयरन मॅन या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

विजय अनपट यांनी ४ किमी पोहणे, १८० किमी सायकलिंग आणि ४२ किमी धावणे असे २२६ किमीचे आव्हान केवळ १२ तास १६ मिनिटांमध्ये पूर्ण करून अनपटवाडी तालुका वाई, पुणे शहरासह संपूर्ण भारताचे नाव उंचावले आहे.या कठीण स्पर्धेत फुल्ल आयरन मॅन, हाल्फ आयरन मॅन साठी जगभरातील ३४०० स्पर्धक सहभागी होते. तथा फुल्ल आयरन मॅन साठी ९२१ पुरुष स्पर्धक सहभागी होते. त्यामध्ये ४९७ क्रमांकावर आणि वयोगट ४५-४९ वयोगटा मध्ये ४९ व्या क्रमांकावर विजयी झाले.या वर्षी स्पर्धे दरम्यान वादळी वाऱ्यासहित पाऊस उष्णतेचे आव्हान, कठीण मार्ग आणि हवामानाच्या प्रतिकूलतेवर मात करून त्यांनी आपल्या नावाप्रमाणेच विजयी कामगिरी करून दाखवली.

सी. ए विजय बाबुराव अनपट यांचे मूळ गाव अनपटवाडी तालुका वाई जि. सातारा असून त्यांचे सध्या वास्तव्य पुणे, नांदेड सिटी येथे असून त्यांचा भारत ते ऑस्ट्रेलिया असा आयरन मॅन विजयी प्रवास हा सर्वांना अगदी थक्क करणार आहे. विजय अनपट यांच्या या यशामुळे वाई, पुणे आणि संपूर्ण भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. त्यांच्या स्वागतासाठी शहरात जल्लोषाचे वातावरण असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

विजय अनपट यांनी या आधी स्पर्धेत फुल्ल आयरन मॅन बारसीलोना मध्ये देखील केवळ १३ तास ०८ मिनिटांमध्ये पूर्ण करून, अनपटवाडी तालुका वाई आणि पुणे नांदेड सिटी आणि भारताचे नाव उंचावले होते तसेच भारतामध्ये देखील त्यानी गोवा, पुणे, मुंबई सह विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. मात्र, फुल आयरन मॅन स्पर्धा पूर्ण करत त्यांनी जागतिक पातळीवर आपले कौशल्य सिद्ध केले आहे.वाई करांसाठी आणि पुणे करांसाठी प्रेरणास्थान बनलेल्या विजय अनपट यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.सी फ्लोरा होम डेकोर चे प्रो. प्रा योगेश प्रकाश भोईटे आणि मित्र परिवार, फलटण यांनी या उत्कृष्ट कामगिरी बाबत सी. ए विजय अनपट यांचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!