मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माडगणी येथे दिली सदिच्छा भेट

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

वाई :- सातारा जिल्हा परिषदेच्या कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन तसेच वाई पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी विजय परीट यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माडगणी तालुका वाई येथे सदिच्छा भेट दिली.

यावेळी वासोळे गावाचे सरपंच ज्ञानदेव कोंढाळकर तसेच माडगणीतील ग्रामस्थही उपस्थित होते. यावेळी शाळेमध्ये सर्व मान्यवर, ग्रामस्थ, शिक्षक विद्यार्थी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत सुभाष भोसले व सहशिक्षक गोवर्धन लक्ष्मण मेहेर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन तसेच वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले.

वासोळे गावचे सरपंच ज्ञानदेव कोंढाळकर यांचेही शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. मान्यवरांनी शाळेतील विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञानाचे विविध प्रश्न विचारले तसेच प्रत्येकाचं वाचन घेतले. विद्यार्थ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला पाहून सर्वांनी समाधान व्यक्त केले बीटस्तरीय झालेल्या क्रीडा प्रकारात शाळेतील इयत्ता सातवीतील विद्यार्थी कु. ओमकार दत्तात्रय सपकाळ यांने लांब उडी या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला व तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. शालेय इमारत पाहून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतःहून नवीन वर्गखोली बांधकामासाठी व शौचालय दुरुस्तीसाठी निधी मंजूर करणार असल्याबाबत आश्वासन दिले. त्यांच्या या निर्णयाचे सर्व ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक यांच्याकडून स्वागत करण्यात आले.

शालेय स्वच्छ परिसर, स्वच्छ व सुंदर माडगणी पाहून तसेच शाळेसाठी ग्रामस्थांचे असणारे सहकार्य पाहून मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय परीट यांनी समाधान व्यक्त केले.

error: Content is protected !!