वाई :- पसरणी गावात आज जिल्ह्यातील पहिल्या विद्युत पुरवठ्यावर चालणाऱ्या ४ चाकी घंटा गाडीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. आपल्या गावचा नावलौकिक करणारा सोहळा पाहण्यासाठी पसरणीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रदुषण इंधन बचत मेन्टेनन्स यासारख्या अनेक गोष्टींचा विचार करून गावाला आधुनिक जगाशी जोडणारा एक धाडसी निर्णय घेतल्याबद्दल ग्रामपंचायत पसरणी यांचे तोंडभरून कौतुक सातारा जिल्हापरिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने भोसले यांनी केले. पसरणी गावच्या विद्यमान सरपंच सौ हेमलता अशोकराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मागील काही वर्षांत पसरणी गावातील अनेक ज्वलंत प्रश्न मार्गी लागले आहेत. रस्ते गटार पाणी व्यवस्थापन लाईट सुविधा या सारख्या मुलभूत प्रश्नांना वाचा फोडत प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात त्यांना मोठे यश आले आहे. या सर्व गोष्टी मार्गी लावण्यात ग्रामपंचायत मधील सर्व सदस्य यांचा त्यांना पाठिंबा असतो.

माजी उपसरपंच विशाल शिर्के यांनी मान्यवरांचे स्वागत केले. आपल्या प्रास्ताविकामध्ये मूलभूत प्रश्नांबरोबर गावचं नाव लौकिक करणाऱ्या विविध योजना गावांमध्ये राबविण्याचे प्रयोग आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील जेष्ठ मंडळींना सोबत घेऊन राबवणार असे विचार युवा नेते स्वप्निल भाई गायकवाड यांनी मांडले.

दोन पद्मश्रींचे गाव म्हणून पसरणीची ओळख साऱ्या जगात आहे या पद्मश्रींच्या नावाचा लौकिक वाढवण्याचे काम आजची पंचायत बॉडी फार जबाबदारीने करत आहे व त्यांना आमची साथ कायम राहील अशी माहिती वाई सुतगिरणीचे व्हाईस चेअरमन धर्माजी शिर्के बापू यांनी दिली. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग प्रज्ञा माने भोसले, सरपंच हेमलता अशोकराव गायकवाड पंचायत समिती सदस्य सुनिता कांबळे, उपसरपंच बद्रीनाथ महांगडे माजी उपसरपंच विशाल शिर्के, सदस्य गेनू हरकळ, आनंदा येवले, राहुल गायकवाड, शारदा महांगडे, अनिता महांगडे, रूपाली शिर्के, सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब जाधव विस्तार अधिकारी राहुल हजारे बांधकाम अभियंता मनोज पवार पाणीपुरवठा अभियंता प्रमोद भोई, कुसगावच्या विद्यमान सरपंच सीमा वरे, व्याळी बोरीच्या सरपंच सुजाता कांबळे,अजय मांढरे, राजेन्द्र येवले, बाळासाहेब शिर्के व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नेटके नियोजन माजी पंचायत समिती सदस्य राजेश शिंदे, अमोल महांगडे, दत्तात्रेय महांगडे आदी मान्यवर ग्रामस्थांनी केले.ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी रामदास निंबाळकर यांच्यासह मनोज मांढरे, उत्तम गाढवे, चंद्रकांत महांगडे, निकिता दुधाने, वैभव महांगडे, काजल गायकवाड यांनी परिश्रम घेतले.