रोहित मारुती वाडकर यांच्या माध्यमातून चिखली प्रीमियर लीग २०२५ क्रिकेट स्पर्धांचे भव्य आयोजन

l महाराष्ट्र माझा l वाई प्रतिनिधी l दि.२ मे २०२५ l

आयपीएल च्या धर्तीवर प्रथमच चिखली येथे चिखली प्रीमियर लीग च्या माध्यमातून भव्य क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. आयपीएल च्या धर्तीवर लिलावाच्या माध्यमातून खेळाडूंची निवड करण्यात येणार असून एकूण १२५ खेळाडू आणि १० संघ लिलावात सहभागी होणार आहेत .सदरच्या स्पर्धांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक षटकार आणि डॉट बॉल ला खेळाडूस आयोजन कमिटी च्या माध्यमातून वृक्ष वाटप करण्यात येणार आहे.

क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून पर्यावरणाबाबत कृतज्ञता म्हणून अशी अनोखे पारितोषिक प्रथमच वाई तालुक्यात ठेवण्यात आलेले आहे.सदरची स्पर्धा ३ आणि ४ मे ला होणार असून लिलाव १३ एप्रिल २०२५ रोजी पार पडणार आहे. रोहित वाडकर युवा मंचाच्या माध्यमातून नेहमी खेळाडूंना आणि तरुणांना प्रोत्साहन देण्याचे काम वाई तालुक्याच्या पश्चिम भागात केले जाते.

कुस्ती,कब्बडी आणि क्रिकेट च्या माध्यमातून खेळाडूच्या पाठीशी उभे राहण्याचे काम रोहित वाडकर यांच्या माध्यमातून केले जाते. चिखली प्रीमियर लीग च्या आयोजनात बक्षीसांची लयलूट होणार असून आयोजन कमिटीच्या माध्यमातून करण वाडकर , सूरज वाडकर,आकाश वाडकर, जीवन वाडकर, शिवम वाडकर , अनिकेत थोपटे, शिवराज वाडकर, शुभम यादव, प्रणव वाडकर, रितेश वाडकर, सिद्धेश वाडकर,सुमित हरगणे,कुणाल जाधव यांनी नियोजनाची भूमिका पार पाडत आहेत.

error: Content is protected !!