मानाचा गणपती मंडळातर्फे कामगारांचा सत्कार

l महाराष्ट्र माझा l वाई प्रतिनिधी l दि.३ मे २०२५ l

१ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून समाजात वेगवेगळ्या स्तरावर राबणाऱ्या कामगारांबद्दल आत्मीयता आणि दिलासा दाखवून वाईतील मानाचा गणपती मंडळाने कामगारांच्या सन्मानार्थ एक अनोखा कार्यक्रम आयोजित केला गेला.

मानाचा गणपती मंडळ हे नेहमी समाज उपयोगी कार्यक्रमांना प्राधान्य देत या पूर्वी ही या मंडळाच्या वतीने आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, नेत्रचिकित्सक शिबीर, गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप, डोळ्यांच्या रोगाचे निदान करून त्यांचे ऑपरेशन, वृक्ष लागवड, सफाई सेवा,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असे वेगवेगळे समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करते.

कामगारांच्या सन्मान सोहळा आणि सत्कार सोहळ्यात वाईतील वेगवेगळे ठिकाणी कार्यरत असणारे कामगारांचा सत्कार करण्यात आला जसे नगरपालिका सफाई कर्मचारी, मिस्त्री कामगार, बांधकाम कामगार,गॅरेज कामगार, ड्रायव्हर, गवंडी कारागीर, लेबर कामगार, अश्या वेगवेगळ्या स्तरांवर कार्यरत असणाऱ्या कामगारांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी आलेले श्रीयुत सुधीर वाळुंज पीएसआय वाई पोलीस स्टेशन यांनी मार्गदर्शन करताना मंडळाच्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाबद्दल प्रशंसा केली व समाज उपयोगी असणारे वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच डॉल्बी सिस्टीमला प्राधान्य न देता त्यासाठी खर्च होणाऱ्या पैशाचा समाज उपयोगी कार्यक्रमासाठी उपयोग केल्याबद्दल प्रशंसा केली.

या कार्यक्रमासाठी संघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक विशाल मोरे, युवा नेते अभिषेक इंगळे, नगरसेवक भारत दादा खामकर, धनंजय हगीर, अशोक मलटने, धनंजय कारळे आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!