चिमुकल्यांनी घेतली ‘पोष्टाची’ माहिती,रमेश गरवारे स्कूलची पोस्ट ऑफिसला भेट

वाई : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या रमेश गरवारे स्कूलमध्ये पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी वाईतील मुख्य पोस्ट ऑफिस कार्यालयास भेट दिली. आधुनिक काळात संपर्कमाध्यमे वाढल्याने पत्रसंस्कृती नष्ट होण्याची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांना पत्र आणि त्याचा प्रवास कसा होतो हे प्रत्यक्ष अनुभवण्याच्या हेतूने ही भेट आयोजित केली होती.

विद्यार्थ्यांनी कार्यालयात टपालपेटी, पोस्टमन, आंतरदेशीय, पोस्टकार्ड तिकिटे व पोष्टाची पाकिटे या विविध गोष्टींची माहिती करून घेतली. विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्तीने अनेक प्रश्न विचारले. तेथील पोस्टल अधिकारी सुनील गोरे, सब पोस्टल अधिकारी मनीषा सुमंत आणि पोस्टमन फारुख शेख यांनी अत्यंत उत्साहाने उत्तरे दिली. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. या उपक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका अपूर्वा कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. अधिकारी आणि कर्मचाऱ्यानी अत्यंत उत्साहाने उत्तरे दिली. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. या उपक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका अपूर्वा कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!