राष्ट्रवादी युवक काँग्रेस वाई तालुका अध्यक्षपदी संतोष पवार यांची नियुक्ती

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

वाई प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) सातारा जिल्ह्याच्या वतीने युवक संघटना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. वाई तालुक्यातील शिरगाव येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले संतोष भगवान पवार यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस वाई तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब यांच्या मान्यतेने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) सातारा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पांडुरंग पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.या नियुक्तीप्रसंगी सौ. सुवर्णाताई पाटील, साहिल बाबा शिंदे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी संतोष पवार यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.नियुक्तीपत्रात नमूद केल्याप्रमाणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. शरदचंद्रजी पवार यांच्या विचारधारेचा प्रचार व प्रसार तळागाळातील सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याची जबाबदारी संतोष पवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

युवकांना संघटित करून पक्षवाढीसाठी प्रभावी कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.या नियुक्तीमुळे वाई तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याला नवी ऊर्जा मिळणार असून युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. संतोष पवार यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!