परभणी येथे संविधानाची मोडतोड करणाऱ्यांचा वाईत संविधान प्रेमी संघटनेकडून जाहीर निषेध

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

वाई :- गेले दोन दिवसापूर्वी परभणी येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची मोडतोड करणाऱ्याच्या विरोधात परभणी येथे जनआंदोलन करण्यात आले.ज्या व्यक्तीने संविधानाची मोडतोड केले याच्या निषेधार्थ आज वाई येथे संविधान प्रेमी समविचारी संघटनेच्या वतीने तहसीलदार वाई, पोलीस उपअधीक्षक वाई, पोलीस निरीक्षक वाई यांना निवेदन देऊन जाहिर निषेध करण्यात आला.

वरिष्ठ पातळीवर चौकशी करुन आंबेडकरी जनतेच्या भावना दाखवणार्‍या प्रकृतीला आळा घालण्यासाठी या घटनेची चौकशी करून या आरोपीच्या पाठीमागे कोणती संघटना किंवा व्यक्ती आहे याबाबत तपास करणे गरजेचे आहे.समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आज लोकशाही मार्गाने निवेदन दिले.संविधानाची मोडतोड करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत महाराष्ट्र सरकार तसेच प्रशासन यांनी या घटना घडु नये यासाठी प्रयत्न करावे अन्यथा वाई तालुक्यातून मोठे जनआंदोलन उभे करु असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

हे निवेदन देताना संविधान प्रेमी समविचारी संघटनेचे भाऊसाहेब सपकाळ, संग्राम खरात, विशाल सपकाळ, धनराज कांबळे,प्रणित मोरे,विकास दादा जाधव,विजय सातपुते,नितीन कांबळे अक्षय कांबळे ,विजय वानखेडे,आकाश गायकवाड, प्रबुद्ध खंडागळे ,अल्केश सोनवने आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!