पसरणी गावातील केळगणे कुटुंबियांच्या घराला आग

वाई:- पसरणी गावातील रवींद्र केळगणे यांच्या घराला सायंकाळी ५ ते ६ दरम्यान आग लागली. स्वयंपाक करते वेळी चुली शेजारी असणारी पाचट यावर ठिणगी पडली आणि त्याचे रूपांतर काही क्षणात भयंकर मोठ्या आगीत झाले. काही सुज्ञ शेतकऱ्यांच्या सावधगिरीमुळे तातडीने घरातील सिलेंडर काढण्यासाठी यश आले ज्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र या व्यतिरिक्त घरातील कोणतीही वस्तू वाचवता आली नाही.

या आगी मध्ये केळगणे कुटुंबीयांचे घरातील ऐवज कागदपत्र धान्य याबरोबर इतर सर्व गोष्टींची राख झाली. अतिशय सामान्य आयुष्य जगणाऱ्या या कुटुंबावर प्रचंड मोठा आघात झाला आहे त्यांच्या संसाराची राख रांगोळी झाली आहे येणाऱ्या काळात त्यांना मदतीची गरज पडणार आहे. शासकीय मदतीबरोबरच पसरणी करांच्या मदतीची सुद्धा अपेक्षा आहे.

error: Content is protected !!