गरवारे युवा विकसन केंद्राच्या माध्यमातून दुर्बल घटकातील युवकांना दर्जेदार शिक्षण देण्याचे काम सुरु ; युवराज थाेरात

वाई: गरवारे युवा विकसन केंद्राच्या माध्यमातून दुर्बल घटकातील युवकांना दर्जेदार शिक्षण देण्याचे काम सुरु असून प्रशिक्षनार्थी स्वता:च्या प‍यावर उभे रहात आहेत, ही बाब काैतुकास्पद आहे. गरवारे युवा विकसन केंद्राचे कार्य काैतुकास्पद असल्याचे असे गाैरवाेदगार गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीचे जनरल मॅनेजर युवराज थाेरात यांनी काढले.गरवारे टेक्निकल फायबर लिच्या वतीने सेवा सहयाेग फाउंडेशनव्दारे सुरू केलेल्या गरवारे युवा विकसन केंद्राच्या दुसर्‍या वर्षाच्या कोर्सेस प्रमाणपत्र वितरण व स्नेह मेळावा कार्यक्रमांप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी व्हाईस प्रेसिडेंट अरविंद कुलकर्णी, सेवा सहयाेग संस्थेचे डायरेक्टर शैलेश घाटपांडे, अर्चना टिके, सुनील पानसे यांची प्रमुख उपस्थिती होती. युवराज थाेरात पुढे म्हणाले, गरवारे टेक्निकल फायबर लिमिटेड आणि सेवा सहयाेग फाऊंडेशन यांनी सुरू केलेल्या गरवारे युवा विकसन केंद्र हा प्रकल्प सर्वांच्या हृदयाजवळचा आहे. सी एस आर च्या माध्यमातून गरवारे कंपनीने बरेच उपक्रम राबवले आहेत. परंतु युवा विकसन केंद्र हा आमच्या सर्वांच्या आवडीचा विषय आहे.

या केंद्राचा वाई परिसरातील युवक युवतींना नक्की फायदा होईल. या मध्ये महिलांचे प्रमाण काैतुकास्पद आहे. सर्व प्रशिक्षणार्थी यांचा सहभाग पाहून मला अतिशय आनंद झालेला आहे. या सर्व तरुण-तरुणींनी सर्व कोर्सेसमध्ये मनापासून सहभाग करून ते पूर्ण करावेत. भविष्यात याचा फायदा सर्वांना नक्की होईल. शैलेश घाटपांडे म्हणाले, सेवा सहयाेग फाउंडेशन गेले पंधरा ते वीस वर्ष या क्षेत्रामध्ये काम करत आहे. त्यांचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. त्यामुळेच गरवारे टेक्निकल फायबर्स लिमिटेड फाऊंडेशन आणि सेवा सहयोग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गरवारे युवा विकसन केंद्राची सुरुवात करण्यात आली.

डिजीटल लिट्रासी, इलेक्ट्रिशन, फिटर, वेल्डर, ब्युटी पार्लर, टेलरिंग, टॅली, ऑफिस असिस्टंट असे अनेक कोर्सेस सुरू असून या कोर्सचा फायदा वाई शहर व परिसरातील तरुण-तरुणींना नक्कीच झाला आहे. औद्योगिकरणाच्या युगात स्किल असणे गरजेचे आहे. स्किल असेल तरच आपण या स्पर्धेच्या युगात टिकू शकतो. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने प्रामाणिकपणे लक्ष देऊन हे कोर्सेस पूर्ण करणे गरजेचे आहे. एका काेर्सवर न थांबता अधिकाधिक ज्ञान घेणे गरजेचे आहे. या केंद्राशी जाेडला गेलेला प्रत्येक विद्यार्थी हा गरवारे परिवारातील आहे. हा परिवार असाच माेठा हाेण्यासाठी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींनी नविन लाेकांना जाेडले पाहिजे. नविन लाेकांना प्रशिक्षण केंद्राबाबत माहिती देऊन काेर्सेसला प्रवेश घेण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे.प्राेजेक्ट समन्वयक अक्षय साेनावणे यांनी प्रास्ताविकामध्ये गरवारे युवा विकास केंद्राच्या स्थापणे पासून आज पर्यंत केलेल्या कार्याचा आढावा सांगितला.

यामध्ये हे केंद्र २०२३ साली सुरु करण्यात आले. त्यावेळेस ५० प्रशिक्षणार्थी हाेते. आज ४५ गावांमधील ५०० पेक्षा जास्त युवक-युवती या प्रकल्पामध्ये सहभागी हाेत आहेत. या पुढील काळात १००० पेक्षा अधिक युवक युवतींना स्वयं राेजगार मिळवून देण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.प्रारंभी मान्यवरांच्याहस्ते भारतमातेचे पुजन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. प्रशिक्षण पूर्ण करून ज्यांनी व्यवसाय सुरु केले व ज्यांना नाेकरीची संधी उपलब्ध झालेल्या प्रितम जमदाडे, शुभम, दिपाली भाेसले, काेमल चव्हाण, दिपाली भिसे, मानसी जमदाडे, निकिता पार्टे, निकिल येवले, साहिल पिसाळ, शिल्पा साळुंखे यांनी मनाेगत व्यक्त केले.

यावेळी गरवारे युव‍ा विकसन केंद्रात हाेणार्‍या कार्यक्रमाविषयी दिपाली शिंदे, निकिता पार्टे व स्नेहल घाडगे यांनी लघुनाटीका सादर केली.विविध काेर्स पूर्ण करणार्‍या प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र तसेच भेटवस्तु वितरित करण्यात आली. शैलेश घाटपांडे, अक्षय साेनावणे, चंदन देशमुख यांनी स्वागत केले. केंद्र समन्वयक चंदन देशमुख यांनी परिचय करुन दिला. पुजा सपकाळ यांनी सूत्रसंचालन केले. श्रीनिवास जमदाडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास कंपनीचे अधिकारी गजानन जाधव, कुमार पवार, वेळे ग्रामपंचायत सदस्य दिपक पवार, सिमरण पुणेकर, सुप्रिया भिसे, सागर घाेडके, अभया मांढरे, तसेच गरवारे कंपनी, सेवा सहयाेग फाऊंडेशन चे पदाधिकारी व कर्माचरी, प्रशिक्षणार्थी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.

error: Content is protected !!