वाई :- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन रि.पा.ई (आ) दिव्यांग संघटनेच्या वतीने वाई तालुक्यातील दिव्यांग महिलांचा सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आल्या. दिव्यांगांचे प्रश्न समोर ठेऊन येणाऱ्या काळात त्यांना बळ देण्याचे काम करण्याचा निर्धार करण्यात आला.

दिव्यांगच्या अनेक योजना दिव्यांगांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही अशोकराव गायकवाड यांनी दिली. ग्रामपंचायत स्तरावर देण्यात येणाऱ्या पेन्शन मध्ये अडचण येत असल्यास सोडविण्याचे काम आम्ही करू अशी माहिती स्वप्निल गायकवाड यांनी दिली. संघटनेतील सर्व पदाधिकारी यांचे त्यांनी कौतुक केले.

या कार्यक्रमाचे नेटके नियोजन दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाजीगर भाई इनामदार, आरिफ भाई मनेर, सूर्यकांत भोसले, अजित जायगुडे, प्रदीप महाडिक, लक्ष्मण शिंदे, रघुनाथ शेलार, रफिक भाई शेख या मान्यवरांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती अशोकराव बापू गायकवाड, स्वप्निल भाई गायकवाड, संतोष तात्या गायकवाड, श्रीकांत निकाळजे,अनुराधा भिसे, काली घाडगे, विनोद शेलार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकसेवक रुपेश मिसाळ यांनी केले.