वाखरी गावची सुकन्या एमपीएससीत यशस्वी! कु.अमृता रामभाऊ ढेकळे पाटील यांची राजपत्रित अधिकारी पदी निवड

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

फलटण | प्रतिनिधी

वाखरी (ता. फलटण, जि. सातारा) गावच्या सुकन्या कु. अमृता रामभाऊ ढेकळे पाटील यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन करत Assistant Project Officer (Gazetted Officer / राजपत्रित अधिकारी) या प्रतिष्ठित पदावर निवड मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे वाखरी गावासह संपूर्ण फलटण तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

एमपीएससीसारख्या अत्यंत कठीण व स्पर्धात्मक परीक्षेत अमृताने मिळवलेले यश हे कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वासाचे फलित आहे. ग्रामीण भागातून येऊनही त्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन करत, अनेक स्पर्धा परीक्षार्थींना नवी दिशा दिली आहे.या निवडीबद्दल अमृताच्या कुटुंबीयांबरोबरच शिक्षक, मित्रपरिवार, ग्रामस्थ आणि विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांकडून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.नुकताच चेतन सुभाष शिंदे व प्रतिभा चेतन शिंदे यांनीही अमृताचा सत्कार केला.

गावात आनंदोत्सवाचे वातावरण असून, अनेक ठिकाणी सत्कार समारंभांचे आयोजन करण्यात येत आहे.“परिश्रमाला पर्याय नाही” हे ब्रीद जपत कु. अमृता ढेकळे पाटील यांनी आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे वाखरी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, त्यांच्या पुढील प्रशासकीय कारकिर्दीसाठी सर्व स्तरांतून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

error: Content is protected !!