वाठार वसाहत मध्ये रोड लाईटचा लपंडाव, ग्रामस्थ त्रस्त

खंडाळा :– वाठार वसाहत ही शासकीय वसाहत येथील रोड लाईट काही ठिकाणी बंद तर काही ठिकाणी चालू अवस्थेत असून ग्रामपंचायत ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थ त्रस्त असून नावालाच ग्रामपंचायत भागात विकास असून प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारची सोयी सुविधा पासून ग्रामस्थ वंचित आहेत.

वाठार वसाहत ही शासकीय वसाहत असून ती वाठार ग्रामपंचायत मध्ये विभागलेली आहे. ही वसाहत स्वतंत्र वार्ड (दत्त वॉर्ड) असून येथे पहिल्यापासूनच अन्य वॉर्ड मध्ये विकास होतो त्या प्रमाणे विकास कामांना मुकलेली आहे. तसेच या वसाहती मधील विद्यमान सदस्य या वाठार बुद्रुक गावचे विद्यमान सरपंच असून याच वॉर्डात याच ग्रामपंचायतीचे आणखीन एक विद्यमान महिला सदस्य असून त्या निवडून आल्यापासून कोणत्याच कामात दिसत नाहीत.

परिणामी त्याच वसाहतीमध्ये वास्तव्याला आहेत, असे असून देखील वाठार वसाहत मध्ये काही ठिकाणी विजेच्या खांबावरील बल्ब बंद पडलेले दिसून येत आहेत व अन्य काही ठिकाणी रोड लाईट देखील जोडलेली नाही त्यामुळे रात्रीचे या वसाहतीमधील काही भाग भकास दिसून येतो. विद्यमान सरपंचांच्या निदर्शनास आणून देखील स्ट्रीट लाईट चे बल्ब बदलले गेले नसून व ज्या ठिकाणी रोड लाईट जोडलेली नाही अशा ठिकाणचा भाग आजही गडद अंधारामध्ये आहे.

error: Content is protected !!