मुंबई: राज्यातील महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या महिन्यातच लाडकी बहीण योजनेचा हफ्ता १५०० वरून २१०० रूपये करण्याचा अंजेडा असणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महायुतीच्या नेत्याने निवडणुकीदरम्यान लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे महायुती सरकारकडूनही शब्द पाळण्यासाठी पहिल्याच महिन्यात याबाबत प्रस्ताव मंजूर करण्याची हालचाली सुरु करण्यात येणार आहे.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची पुन्हा पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे. कारण अनेक अपात्र महिला योजनेचा लाभ घेत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सरकारकडून लाडकी बहीण योजनेत काही ठिकाणी बोगस आधारकार्डचा वापर झाला आहे का? याची पडताळणी केली जाणार आहे. खोटे कागदपत्र देत कुणाकडून फसवणूक केली जात नाही ना याची देखील तपासणी केली जाणार आहे. एका रेशनिंग कार्डवर नाव असलेले कोणत्याही दोन महिला योजना लाभ घेता येणार आहे.
मात्र पॅनकार्डधारक तसेच आयकर भरणाऱ्या महिला तसेच जास्त उत्पन्न नोकरदार महिलांना या योजनेतून वगळण्याची शक्यता आहे. तसेच संजय गांधी निराधार यासह अन्य योजनांचा फायदा घेत असतील तर लाडकी बहिण योजना लाभ घेता येणार नाही, अशी देखील आधीची तरतूद आहे, याची देखील पडताळणी केली जाणार आहे.
ताज्या बातम्यांसाठी आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील व्हा.
- शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल : डॉ. वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’
- अनैतिक संबंधातून तरुणाचा निर्घृण खून,फलटण ग्रामीण पोलीसांकडून अवघ्या ४ तासांत गुन्हा उघड
- “एक दृश्य… आणि आठवणींचा पूर : फलटण नगर परिषदेत हिंदुराव नाईक निंबाळकरांचा वारसा जिवंत”
- खंबाटकी घाटातील नव्या बोगद्याची ट्रायल सुरू; आठ दिवस वाहतुकीसाठी खुले राहणार
- फलटण तालुक्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू

