मुंबई: राज्यातील महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या महिन्यातच लाडकी बहीण योजनेचा हफ्ता १५०० वरून २१०० रूपये करण्याचा अंजेडा असणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महायुतीच्या नेत्याने निवडणुकीदरम्यान लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे महायुती सरकारकडूनही शब्द पाळण्यासाठी पहिल्याच महिन्यात याबाबत प्रस्ताव मंजूर करण्याची हालचाली सुरु करण्यात येणार आहे.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची पुन्हा पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे. कारण अनेक अपात्र महिला योजनेचा लाभ घेत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सरकारकडून लाडकी बहीण योजनेत काही ठिकाणी बोगस आधारकार्डचा वापर झाला आहे का? याची पडताळणी केली जाणार आहे. खोटे कागदपत्र देत कुणाकडून फसवणूक केली जात नाही ना याची देखील तपासणी केली जाणार आहे. एका रेशनिंग कार्डवर नाव असलेले कोणत्याही दोन महिला योजना लाभ घेता येणार आहे.
मात्र पॅनकार्डधारक तसेच आयकर भरणाऱ्या महिला तसेच जास्त उत्पन्न नोकरदार महिलांना या योजनेतून वगळण्याची शक्यता आहे. तसेच संजय गांधी निराधार यासह अन्य योजनांचा फायदा घेत असतील तर लाडकी बहिण योजना लाभ घेता येणार नाही, अशी देखील आधीची तरतूद आहे, याची देखील पडताळणी केली जाणार आहे.
ताज्या बातम्यांसाठी आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील व्हा.
- २९ वरून ६० संस्थांपर्यंत समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची मजल; संजीवराजेंना दिली कडवी झुंज, विजयासाठी अवघी सहा मते पडली कमी!
- फलटण तालुका सोसायटी मतदारसंघात संजीवराजेंचा विजय; समशेरसिंहांनी दिली जोरदार टक्कर!
- निवडणुकीतील पराभव मनाला न लावता नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर पुन्हा जनसेवेत सक्रिय!
- धान्य कोट्याच्या कामासाठी ३,५०० रुपयांची लाच; माण तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात!
- फलटणमध्ये बालाजी स्वीट्स व गनबोटे मिल्क प्रॉडक्ट्सला निकृष्ट दर्जाच्या खव्याप्रकरणी दीड लाखांचा दंड

