मुंबई: राज्यातील महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या महिन्यातच लाडकी बहीण योजनेचा हफ्ता १५०० वरून २१०० रूपये करण्याचा अंजेडा असणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महायुतीच्या नेत्याने निवडणुकीदरम्यान लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे महायुती सरकारकडूनही शब्द पाळण्यासाठी पहिल्याच महिन्यात याबाबत प्रस्ताव मंजूर करण्याची हालचाली सुरु करण्यात येणार आहे.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची पुन्हा पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे. कारण अनेक अपात्र महिला योजनेचा लाभ घेत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सरकारकडून लाडकी बहीण योजनेत काही ठिकाणी बोगस आधारकार्डचा वापर झाला आहे का? याची पडताळणी केली जाणार आहे. खोटे कागदपत्र देत कुणाकडून फसवणूक केली जात नाही ना याची देखील तपासणी केली जाणार आहे. एका रेशनिंग कार्डवर नाव असलेले कोणत्याही दोन महिला योजना लाभ घेता येणार आहे.
मात्र पॅनकार्डधारक तसेच आयकर भरणाऱ्या महिला तसेच जास्त उत्पन्न नोकरदार महिलांना या योजनेतून वगळण्याची शक्यता आहे. तसेच संजय गांधी निराधार यासह अन्य योजनांचा फायदा घेत असतील तर लाडकी बहिण योजना लाभ घेता येणार नाही, अशी देखील आधीची तरतूद आहे, याची देखील पडताळणी केली जाणार आहे.
ताज्या बातम्यांसाठी आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील व्हा.
- फलटण मध्ये शिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी एक जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, फलटण येथील लॉजवरही करण्यात आला अत्याचार
- मालदन फाट्या जवळील रस्त्याकडेला लोंबणाऱ्या फांद्यामुळे रस्ता वाहतुकीस अडथळा
- कोळकी येथे विजेच्या स्मार्ट मीटरच्या सक्ती विरोधात कोळकी ग्रामस्थ आक्रमक, स्मार्ट मीटरची सक्ती केल्यास ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
- श्री सदगुरू हरिबुवा महाराज सहकार प्रशिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शितल अहिवळे; रविंद्र बेडकिहाळ उपाध्यक्षपदी निवड
- फलटण तालुक्यातील सहकारी पतसंस्था सक्षम करण्याचे काम प्राधान्याने केले जाईल; दिलीपसिंह भोसले