फलटण प्रतिनिधी: फलटण शहरातील मंगळवार पेठ परिसरात असलेल्या स्मशानभूमीजवळ एका अनोळखी तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ६ मार्च २०२६ रोजी सकाळी ७.४० वाजण्यापूर्वी मौजे फलटण येथील मंगळवार पेठ स्मशानभूमीजवळ आठमोरी कॅनॉल परिसरातील बाभळीच्या झाडाला एका अनोळखी पुरुषाने गळफास घेतल्याचे आढळून आले. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ३५ वर्षे असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
या घटनेची माहिती मिळताच फलटण शहर पोलिस ठाण्याचे पोलीस हवालदार आतीश हनुमंत चांदगुडे (बकल नं. ९७२) यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यू रजिस्टर नं. १४/२०२६ नोंद करण्यात आली आहे. हा गुन्हा भा.न्या.सं. कलम १९४ अन्वये नोंदविण्यात आला आहे.पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू असून परिसरातील नागरिकांकडे चौकशी करण्यात येत आहे.या प्रकरणाचा पुढील तपास फलटण शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार बारेला करत आहेत.जर कोणाला या व्यक्तीबाबत माहिती असल्यास फलटण शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

