महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
दिनांक : २६ मे २०२६ फलटण : फलटण शहरातील गिरवी नाका परिसरात सुरू असलेल्या “श्रीनीश चित्रकला वर्गा”त नवीन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून १५ जून २०२६ पासून नवीन बॅचला प्रारंभ होणार आहे. शनिवार व रविवार या दिवशी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे.
या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना चित्रकला, स्केचिंग, पेन्सिल शेडिंग, रंगकाम, निसर्ग चित्रकला, व्यंगचित्रकला, वारली चित्रकला, मंडला कला, झेंटँगल कला आदी विविध कला प्रकारांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच एलिमेंटरी व इंटरमीडिएट ग्रेड परीक्षांची तयारीही करून घेतली जाणार असल्याची माहिती वर्गाच्या आयोजकांनी दिली.
चित्रकलेची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्जनशील कौशल्य विकसित करू इच्छिणाऱ्या मुलांसाठी हा वर्ग उपयुक्त ठरणार असल्याचे सांगण्यात आले. इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रवेश घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पत्ता : गिरवी नाका, फलटण संपर्क : ९२७२१९०१९०

