
मालदन फाट्या जवळील रस्त्याकडेला लोंबणाऱ्या फांद्यामुळे रस्ता वाहतुकीस अडथळा
ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- ढेबेवाडी ते तळमावले चौपदरीकरण झालेल्या रस्त्याच्या मालदन स्टॉपनजीक पूर्व दिशेला 50 फूट अंतरावरती रस्त्यालगत असलेल्या झाडाच्या फांद्या डांबरीकरणालगत लोंबकळत आहेत. त्यामुळे दोन वाहने एकाचवेळी जात असतील तर लोंबकळणाऱ्या फांद्या वाहनास धडकत आहेत. रस्त्यावर लोंबणाऱ्या फांद्यामुळे वाहतूक धोकादायक बनली आहे. ढेबेवाडी- कराड रस्त्याचे काही वर्षांपूर्वी चौपदरीकरण करण्यात आले. या चौपदरीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा…