महावितरणच्या विरोधात जनतेत नाराजी; फलटणमध्ये रोडलाईटच्या वेळेचा प्रश्न कायम
सायंकाळी ६.१० ते ६.१५ वाजता रोडलाईट सुरू करण्याची मागणी; स्मार्ट मीटरच्या वेळापत्रकात बदल करण्याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांची गैरसोय महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण : फलटण नगरपरिषद हद्दीतील विविध ठिकाणच्या रोडलाईट विद्युत जोडण्यांसाठी महावितरणमार्फत स्वयंचलित स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. या मीटरच्या निर्धारित वेळापत्रकानुसार सायंकाळी ७.१५ वाजता रोडलाईट सुरू होतात, तर सकाळी ६:४५ वाजता…

