Maharashtra Maza

एकनाथ शिंदे यांची प्रकृतीत सुधारणा, आज साताऱ्याहून मुंबईला परतणार!

सातारा:- महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत साशंकता आहे. गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर होऊ शकले नाही, त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही बैठक मुंबईत होणार होती. मात्र, दिल्लीहून मुंबईत परतल्यानंतर लगेचच महाराष्ट्राचे कार्यवाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा येथील त्यांच्या मूळ गावी गेले. तेथे पोहोचल्यानंतर शिंदे…

Read More

थंडीचा जोर राज्यात कमी होणार, राज्यात पावसाचीही शक्यता

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला होता. मात्र, आता थंडीचा जोर कमी होणार असून राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.फेंगल वादळ तामिळनाडूच्या किनाऱ्यावर धडकले आहे. या चक्रीवादळाच्या परिणामी राज्यातील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फेंगल वादळामुळे थंडीची तीव्रता कमी होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले. मुंबईसह राज्यभरातील थंडी…

Read More

महायुती सरकारचा आझाद मैदानावर शपथविधीः ५ डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा पार पडणार

मुंबई:- भाजपाने सत्ता स्थापनेचा आणि शपथविधीचा कार्यक्रम आज जाहिर केला असून या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याची घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात एक व्हिडीओ आणि ट्विटरवर पोस्ट करत महायुती सरकारचा शपथविधी होणार असल्याची माहिती दिली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ५ डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी सोहळा…

Read More

मुधोजी महाविद्यालयाची जलतरणपटू कु.रुचिता कदम हिला सर्वोत्कृष्ट जलतरणपटूचा बहुमान

फलटण -शिवाजी विद्यापीठ अंतरविभागीय जलतरण स्पर्धेमध्ये मुधोजी महाविद्यालयाची जलतरणपटू कु.रुचिता कदम हिला शिवाजी विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट जलतरणपटू चषक देऊन बहुमान मिळाला.रा.शाहू महाविद्यालय,कोल्हापूर सन 2024-25 येथे झालेल्या शिवाजी विद्यापीठ अंतरविभागीय जलतरणस्पर्धेमध्ये मुधोजी महाविद्यालय,फलटणची जलतरण कन्या कु.रुचिता कदम हिला शिवाजी विद्यापीठ सर्वोत्कृष्ट जलतरणपटू चा चषक देऊन बहुमान मिळाला तसेच वैयक्तिक महिला सर्वोत्कृष्ट जलतरणपटू चा सुद्धा चषक देऊन बहुमान…

Read More

गोखळी येथील दोन हार्डवेअर दुकानात 50 हजाराची चोरी

फलटण प्रतिनीधी:- मौजे गोखळी येथील दोन हार्डवेअर दुकानात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून सुमारे 50 हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात स्वतःच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार व फिर्यादी उदयसिंह आत्माराम घाडगे ( रा. गोखळी ता. फलटण) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल…

Read More

जर्शी गायी व कालवड कत्तलीसाठी घेवुन जात असताना आढळून आल्या प्रकरणी दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

फलटण प्रतिनिधी:- वाठार निं. ता. फलटण गावच्या हद्दीत वाठार फाटा या ठिकाणी दोन जर्शी गायीची व एक कालवड कत्तलीसाठी घेवुन जात असताना आढळून आल्या प्रकरणी दोन जणांच्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 28/11/2024 रोजी सायंकाळी 5.40 वाजण्याच्या सुमारास वाठार निं. ता. फलटण गावच्या हद्दीत…

Read More

विकासाची अनेक कामे केली पण ती लोकांपर्यंत पोहोचवून श्रेय घेण्यात मागे राहिल्याने पराभव राजे गटाची कबुली

फलटण: फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघात गेल्या ३० वर्षात आपण जिरायत पट्टा बागायत करण्यासह विकासाची अनेक कामे केली पण ती लोकांपर्यंत पोहोचवून त्याचे श्रेय घेण्यात मागे राहिल्याने ३० वर्षानंतर प्रथमच पराभवाला सामोरे जावे लागले, आगामी काळात त्यामध्ये सुधारणा करुन आपण यशस्वी होऊ, तथापि कोणीही खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने काम करुया असे आवाहन…

Read More

उत्तर कोरेगावचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध : माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

उत्तरेचा भूमिपूत्र या नात्याने आपल्या सेवेशी कार्यतत्पर: सचिन पाटील फलटण: उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिलेला शब्द पाळतात,त्यांच्या सोबतीने उत्तर कोरेगावचा पाणी प्रश्न सोडवून,या भागात एमआयडीसी उभी करुन, तरुणांना रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करु असे,आश्वासन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले.पिंपोडे बुद्रुक ता.कोरेगाव येथे उत्तर भागाच्यावतीने नवनिर्वाचित आमदार सचिन पाटील यांचा सत्कार सभारंभ व मतदारांचा आभार…

Read More

झालेल्या चुका मान्य करून संघर्षाला सुरुवात; श्रीमंत रामराजेंचे WhatsApp स्टेटस वायरल

फलटण :- फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधून दीपक चव्हाण यांचा पराभव झाला तर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात सचिन पाटील हे विजयी झाले. त्या अनुषगाने काल शरद पवार राष्ट्रवादी पक्ष राजे गटाचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा सुद्धा पार पडला.यामध्ये कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन झाले पण या मेळाव्यास श्रीमंत रामराजे यांचे अनुपस्थिती होती….

Read More

मुख्यमंत्रिपदावरून एकमत होत नसल्याने आता एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार ? महायुतीत अस्वस्थता.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीचा निकालही जाहीर झाला आहे. यामध्ये भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला चांगले यश मिळाले असून, बहुमताचा आकडाही पार केला आहे. या निकालाला आता आठवडा होत आहे. तरी नव्या सरकारबाबतचा मुद्दा अजूनही अडकला आहे. शुक्रवारी मुंबईत होणारी महायुतीची महत्त्वाची बैठक पुढे ढकलून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक साताऱ्यातील दरे…

Read More
error: Content is protected !!