Maharashtra Maza

धुमाळवाडी धबधबा परिसरात पर्यटकांना शस्त्राचा धाक दाखवून दहा जणांच्या टोळीने केली लूटमार

फलटण प्रतिनिधी:- फलटण तालुक्यातील प्रसिद्ध असणारा धुमाळवाडी धबधबा परिसरात धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना अडवून शस्त्राचा धाक दाखवून दहा जणांच्या टोळीने लूटमार केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे फलटण तालुक्यात खळबळ माजली आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, फिर्यादी राहुल भारत मंजरतकर (रा. जुन्या पोस्टाजवळ, सनगरगल्ली, शुक्रवार पेठ, फलटण, ता. फलटण, जि. सातारा) यांच्याकडे त्यांचे…

Read More

ग्रामपंचायत काळदरीच्या मनमानी कारभाराबाबत गटविकास अधिकारी पंचायत समिती पुरंदर यांना निवेदन

पुरंदर प्रतिनिधी :- काळदरी ग्रामपंचायत मध्ये चालु असलेल्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अनेक दिवसापासून भोंगळ चालू आहे नागरिक या प्रकाराला प्रचंड वैतागलेले आहेत. काळदरी हा दुर्गम भाग असुन या भागात सद्या अनेक वाडी वस्तीवर ९० टक्के पेक्षा जास्त जेष्ठ नागरिक राहात आहेत. पाण्याची समस्या उन्हाळा चालू…

Read More

माजी मंत्री महादेव जानकर यांची विशाल माडकर यांच्या निवासस्थानी भेट

फलटण प्रतिनिधी:- सुरवडी गावचे सुपुत्र राष्ट्रीय समाज पक्षाचे कट्टर समर्थक युवा नेतृत्व विशाल बापू माडकर यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी सदिच्छा भेट दिली. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी आपुलकीच्या नात्याने सुसंवाद साधणारे नेते म्हणून महादेव जानकर यांना ओळखले जाते.महादेव जानकर यांच्या…

Read More

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर ढेबेवाडी पोलीसांची कारवाई

जानेवारी २०२५ ते जून अखेर १२९२ वाहनावर कारवाई, ६ लाख ६३ हजार ६०० रुपये दंड ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- ढेबेवाडी,तळमावले परिसरामध्ये जानेवारी २०२५ पासून वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर ढेबेवाडी पोलीसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, यामध्ये ट्रिपलसीट, वाहन चालवताना मोबाइलचा वापर करणे, रहदारीस अडथळा होईल अशा पद्धतीने वाहन पार्किंग करणे, पोलिसांचे आदेश…

Read More

कुसूर येथे कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण करून महाराष्ट्र कृषि दिन साजरा

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न दादासाहेब मोकाशी कृषी महाविदयालय, राजमाची ता.कराड येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव आणि कृषि औधोगिक संलग्न उपक्रमांतर्गत कुसूर (ता. कराड) येथे दि.1 जुलै या दिवसी वृक्षारोपण करून महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला. दरम्यान वसंतराव नाईक यांचे स्मरण तसेच वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रासाठी केलेले…

Read More

काळगाव परिसरातील करपेवाडी येथे रानडुकरे व गव्याकडून भात रोपांच्या तरव्याचे नुकसान

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- गव्यांचे लोंढेच्या लोंढे व रानडुक्करांचे कळप जंगलाबाहेर पडल्याने विभागातील डोंगर पट्ट्यासह इतर गावातील शेत कऱ्यांची झोपच उडाली असून काळगाव परिसरातील करपेवाडी येथील शेतकऱ्यांच्या भात पिकांच्या तरवाचे मोठ्या प्रमाणात गवे व डुक्करांनी तुडवून व खावून मोठे नुकसान नुकसान झाले आहे. वन विभागाने वन्यप्राण्याचा बंदोबस्त करावा व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या…

Read More

वेळ अन पैशाची बचत करणारी ड्रोन फवारणी आता खंडाळा, शिरवळ,लोणंद परिसरात उपलब्ध

शिरवळ प्रतिनिधी:- गेल्या काही वर्षापासून ऋतुमानात होत असलेल्या बदलाने पिकाला फवारणी करण्यास विलंब होत आहे. त्यातच पावसाने जरा उघडीप दिली तर फवारणीसाठी मजूर मिळेना. त्यामुळे आता शेतकरी ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीने फवारणी करण्याकडे वळत आहे. वेळ अन पैशाची बचत करणारी ड्रोन फवारणी आता खंडाळा, शिरवळ,लोणंद परिसरात उपलब्ध झाली आहे. ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट कृषी विज्ञान केंद्र बारामती…

Read More

खंडाळा तालुक्यातील ६३ ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत जाहीर

खंडाळा प्रतिनिधी – आज दिनांक४/७/२०२५ रोजी ११:०० वां पंचायत समिती खंडाळा येथील किसन वीर सभागृहात खंडाळा तालुक्यातील ६३ ग्रामपंचायत सरपंच पदाची २०२५-२०२३० आरक्षण सोडत उपजिल्हाधिकारी सातारा तथा निवडणूक निर्णय अधिकारी भगवान कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली खंडाळा तहसीलदार अजित पाटील यांनी तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींचे चिठ्ठीद्वारे जाहीर केले ते खालील प्रमाणे लोहोम -अनुसूचित जाती स्त्री, कवठे – अनुसुचित…

Read More

खळे नगरीत धुमधुमला हरी नामाचा गजर, प्राथमिक शाळेमध्ये आषाढीवारीचे आयोजन

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :-पंढरपूरची ‘वारी’ हा समता, बंधुता, एकतेचा संदेश देणारा सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे. यात कोणत्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा असण्यापूर्वी माणूस असणे आवश्यक बंधनकारक आहे. किंबहुना मूलभूत गरजच आहे.संत साहित्यातून नुसता ‘माणूस’च नाही तर ‘चांगला माणूस’ घडण्याची प्रक्रिया होत असते. जात, धर्म, पंथाच्या पलीकडे जाऊन ‘माणूस’ म्हणून सर्वांना एकत्र करीत समतेचे कार्य…

Read More

मालदनचे विद्यालय संरक्षक भिंतीच्या प्रतीक्षेत

तीन वर्षापूर्वी विद्यालयाच्या इमारतीत पाणी शिरून शैक्षणिक साहित्याचे झाले होते नुकसान ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- वांग नदीकाठी असलेल्या मालदन ता.पाटण येथील माध्यमिक विद्यालयाच्या शाळेला संरक्षक भिंत मिळणार कधी? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. तीन वर्षापूर्वी झालेल्या अतिवृष्टीत वांग नदीला आलेल्या पुरात येथील हायस्कूल उध्वस्त झाले होते.त्यावेळी अनेकांनी मदतीचा हात देवून हे विद्यालय सावरले.हे…

Read More
error: Content is protected !!