Maharashtra Maza

पाटण तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, खा. उदयनराजे यांचे तातडीने पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- पाटण तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, अनेक शेतकऱ्यांची शेती पडूनच आहे. काही जणांनी पेरण्या केल्या असल्या तरी सतत पडणाऱ्या पावसामुळे ती पिके कुजण्याच्या वाटेवर आहेत या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याचे खा. उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे स्पष्ट…

Read More

दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालया अंतर्गत वृक्षारोपण

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- उमरकांचन ता. पाटण या ठिकाणी दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय राजमाची ता. कराड यांच्या माध्यमातून 1 जुलै 2025 रोजी ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत कृषी दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने उमर कांचन या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ढेबेवाडी येथील वनाधिकारी अमर पन्हाळे त्यांचे सहकारी व विपुल गोडांबे, मोकाशी महाविद्यालयाचे प्राध्यापक अक्षय माने,…

Read More

तळमावले येथील निवारा शेडची दुरावस्था, विद्यार्थी तसेच प्रवासी यांना मिळेना आसरा

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- तुटके व गळके छप्पर, शेडमध्ये अस्वछता,बाकड्यांची झालेली दुरावस्था..तुटलेल्या खिडक्या,यामुळे तळमावले ता.पाटण येथील पिकअप शेड प्रवाशांसाठी असून अडचण आणि नसून खोळंबा बनले आहे. शहरीकरणाकडे वाटचाल सुरु असलेल्या तळमावले या ठिकाणची वर्षानुवर्षाची असणारी गैरसोय दूर होणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ढेबेवाडी – कराड मार्गावरील मुख्य रस्त्यावरील तळमावले बाजारपेठेचा झपाट्याने…

Read More

“सातारा जिल्ह्यामध्ये शेतीमध्ये प्रथमच होणार ए.आय तंत्रज्ञानाचा वापर”

शिरवळ प्रतिनिधी :-“ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट कृषी विज्ञान केंद्र बारामती” यांच्या माध्यमातून वाठार कॉलनी (भादे) येथे करण जगताप यांच्याकडे ऍग्रो नॉमिक्स एग्रीकल्चर ड्रोन सुविधा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. ड्रोन फवारणी मुळे शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणारे आहे, तसेच पिकावरील औषध देखील कमी लागणार असून सर्वात महत्वाचे एक एकरसाठी फक्त १० लिटर पाण्याचा वापर होत आहे त्यामुळे पाण्याची…

Read More

फलटण नगर परिषद पाणी पुरवठा विभागाच्या बेताल कारभारामुळे शहरातील नागरिक त्रस्त

फलटण प्रतिनिधी:- फलटण नगर परिषद पाणी पुरवठा विभागाच्या बेताल कारभारामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या समस्यांचे निरसन होत नसल्याने नागरिकांमध्ये नगर परिषदेच्या विरोधात असंतोष खदखदत आहे. एक एक दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून विविध कारणामुळे शहरातील पाणीपुरवठा सतत ठप्प होत आहे. वॉल फुटला आहे, ट्रान्सफॉर्मर जळला…

Read More

बांगलादेशी महिला फलटण मध्ये बेकायदेशीर वास्तव्यास, विविध नावांची कागदपत्रे सापडली

फलटण प्रतिनिधी :  भिलकटी, ता. फलटण येथे बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असलेली बांगलादेशी महिला पोलिसांना आढळून आली असून . काटून एम. एस. टी. एंजेला असे पासपोर्टवर त्या महिलेचे नाव असून तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.                याबाबत फलटण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना जिल्हा विशेष शाखेकडून फलटण तालुक्यात एक विदेशी महिला…

Read More

फलटण तालुक्यात गूढ आवाजाची मालिका कायम

फलटण प्रतिनिधी: फलटण तालुक्यात गूढ आवाजाची मालिका कायम असून, मंगळवारी (दि.१) सकाळी ९.०० वाजता मोठा गूढ आवाज आल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. ब्लास्टिंग सारख्या आवाजाप्रमाणेच हा गूढ आवाज असल्याचे सांगण्यात येत होते. या आवाजाबद्दल नागरिकांमध्ये संभ्रमावस्था कायम असून, तालुका प्रशासनाकडून याबाबत कुठल्याही प्रकारची माहिती दिली गेली नाही. याबाबत सविस्तर माहिती अशी की, फलटण शहरा लगतच्या…

Read More

ढेबेवाडी बाजारपेठेतील खड्डे मुरूम टाकून अखेर मुजवले,”महाराष्ट्र माझा” बातमीचा इम्पॅक्ट

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :- ढेबेवाडी बाजारपेठेतील रस्त्यांची खड्ड्यामुळे अक्षरश चाळण झाली आहे. जागोजागी खड्डे पडल्याने खड्ड्यात पाणी साचून तळ्याचे स्वरूप निर्माण झाले होते याबाबत “महाराष्ट्र माझा” बातमी प्रसिद्ध होताच ग्रामपंचायत कडून खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून खड्डे मुजवण्यात आले. मागील आठवड्यात मंगळवार रोजी ढेबेवाडीचा बाजार असल्याने व्यापारी व ग्राहकांना येजा करताना मोठी कसरत करावी लागत होती….

Read More

नवीन वीज जोडणी करीता महावितरण कर्मचारी त्रास देत असल्याने वीज ग्राहक हैराण

फलटण प्रतिनिधी :- फलटण महावितरणच्या विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व उपविभागात नवीन वीज मीटर जोडणीचे पैसे भरूनही जोडणी करीता लाईनमन व जनमित्र त्रास देत असल्याने वीज ग्राहक हैराण झाले आहेत. फलटण विभागीय कार्यालयांच्या अंतर्गत येणाऱ्या फलटण शहर, फलटण ग्रामीण, लोणंद, खंडाळा या उपविभागीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भागातील वीज ग्राहक पुरते वैतागले असून महावितरण कर्मचारी यांच्याकडून…

Read More

संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा फलटण येथे विजेच्या धक्क्याने मृत्यू

फलटण प्रतिनिधी: संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यातील दोन वारकरी तुषार रामेश्वर बावनकुळे वय २२ रा खलासना नागपूर व मधुकरराव तुकारामजी शेंडे वय ५५ रा मेडिकल चौक नागपूर यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला असून उपचारासाठी नातेपुते ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले होते या वेळी त्यांना मृत घोषित करण्यात आले. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बरड जवळ टोल नाका नजीक…

Read More
error: Content is protected !!