श्री नाईकबा यात्रेच्या नियोजन बैठकीत प्रांताधिकारी व तहसीलदारांकडून विविध विभागांना सूचना
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क ढेबेवाडी प्रतिनिधी – महेश जाधव श्री क्षेत्र बनपुरी येथील श्री नाईकबा देवाच्या यात्रेसाठी महाराष्ट्र व कर्नाटकातून मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या. यात्रेच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत विविध विभागांवर सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडाव्यात, त्यात कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही, असा…

