नाईकबा डोंगरावर फुलला भक्तीचा मळा
ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :- नाईकबाच्या नावान चांगभल, क्रुष्णामाईच्या नावान चांगभल, घोड्याच्या नावान चांगभलssss चांगभलचा गजर घुमतोय नाईबा डोंगरावर श्री नाईकबा देवाच्या वार्षिक यात्रेस आज उत्साहात सुरुवात झाली. महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो भाविकांची बनपुरी नाईकबा येथे मोठी गर्दी झाली असून, चांगभलच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. बैलगाड्या, पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांच्या निनादात यात्रेचा शुभारंभ…

