ढेबेवाडी येथील गटार तुंबल्याने दूषित पाणी रस्त्यावर, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

ढेबेवाडी प्रतिनिधी :- दोन ग्रामपंचायतच्या हद्दीच्या वादामुळे गटारगंगा रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून याप्रकरणी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांच्यातून होत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, येथील ग्रामपंचायतीने ढेबेवाडी ता. पाटण (ढेबआळी ) येथे मोरे दुकान ते काळगुडे गुरुजी यांच्या घरापर्यंत नवीन गटार बांधले आहे. या गटातील पाण्याचा निचरा होण्यासाठी काही…

Read More

भाड्याने घेऊन कर्नाटक येथे विक्री केलेले दोन ट्रॅक्टर व पोकलैंड जप्त, आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

फलटण प्रतिनिधी:- फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करून भाड्याने घेऊन कर्नाटक येथे विक्री केलेले तब्बल ६५ लाख रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टर व एक पोकलैंड मशिन जप्त करून कर्नाटकातील आंतरराज्य टोळीतील दोन संशयित आरोपींनी अटक करून त्यांच्याकडून दोन ट्रॅक्टर व एक पोकलैंड मशिन हस्तगत करण्यात आले आहेत. याबाबत फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार,फलटण तालुक्यातील शेतकरी विनय…

Read More

महसूल विभागाच्या “सेवा पंधरवडा” अभियानाचा राजाळे येथे शुभारंभ

फलटण प्रतिनिधी: महसूल विभागाच्या “सेवा पंधरवडा” अभियानाचा शुभारंभ आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत राजाळे येथे सकाळी १०.३० वाजता होणार असून “सेवा पंधरवडा” अभियानात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी केले आहे. “सेवा पंधरवडा” अभियानात प्रथम टप्प्यात शिवरस्ते, पाणंद रस्ते यांचे सीमांकन घेऊन नकाशावर नोंदी करणे तसेच रस्त्यांना क्रमांक देण्यात येणार आहेत….

Read More

फलटण तालुक्यात “सेवा पंधरवडा” चे आयोजन, नागरिकांनी सहभागी होण्याचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांचे आवाहन

फलटण प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म दिन १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर या कालावधी दरम्यान संपूर्ण राज्यामध्ये “सेवा पंधरवडा” आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार व ना. चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली त्या अनुषंगाने सचिन पाटील, आमदार, फलटण (अ.जा.) विधानसभा सदस्य, जिल्हाधिकारी सातारा, उपविभागीय…

Read More

ढेबेवाडी बाजारतळ येथील श्री गणेश मंडळ गणपतीचे भक्तिमय वातावरणात विसर्जन

ढेबेवाडी प्रतिनिधी – ढेबेवाडी ता. पाटण येथे शनिवारी श्री गणेश मंडळ बाजारतळ येथील दगडू शेठ गणपतीचे विसर्जन भक्तिमय वातावरणात झाले. डॉल्बीला फाटा देत अध्यात्मिक व सात्वीक वातावरणात पारंपारिक वाद्य ढोल ताशाच्या गजरात तसेच गेले पंधरा वर्षापासून गुलाल विरहीत काढण्यात आलेल्या ढेबेवाडी येथील श्री गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीने पंचक्रोशीच्या गणेश मंडळांसमोर आदर्श निर्माण केला आहे. भक्तीमार्गाऐवजी…

Read More

अत्यंत स्वच्छ व पारदर्शक कारभारामुळे महाराजा मल्टीस्टेटची घोडदौड सुरुच ; दिलीपसिंह भोसले

फलटण प्रतिनीधी:- महाराजा मल्टीस्टेट संस्था प्रगतिपथावर असून सभासदांचा विश्वास जपण्यास यशस्वी ठरली आहे ,त्यामुळेच संस्थेचा प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस चढता असल्याचे दिसत असून अत्यंत स्वच्छ व पारदर्शक कारभारामुळे महाराजा मल्टीस्टेट ची घोडदौड सुरु असून महाराजा मल्टी पर्पज च्या माध्यमातून विविध उपक्रम भविष्यात राबविले जातील, असे प्रतिपादन महाराजा मल्टीस्टेट चे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी केले. महाराजा…

Read More

आयडियल इंटरनॅशनल स्कूल फलटणमध्ये अनोख्या पद्धतीने “शिक्षक दिन” उत्साहात साजरा

फलटण प्रतिनीधी : आयडियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या विशेष दिवशी विद्यार्थ्यांनी डायरेक्टर, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, एच.ओ.डी, स्पोर्ट्स टीचर, म्युझिक व डान्स टीचर, क्लार्क, शिपाई, मावशी अशा विविध भूमिका साकारल्या. या नवीन टीमने शाळेचे सर्व कामकाज शिस्तबद्धपणे अनोख्या पद्धतीने पार पाडत खऱ्या अर्थाने शिक्षक दिन साजरा केला. डायरेक्टर झालेल्या शर्व भोईटे यांनी…

Read More

फलटण येथील सार्वजनिक व घरगुती गणपती मूर्तींचे भक्तीभावाने विसर्जन

फलटण प्रतिनिधी:-दहा दिवस भक्तीभावाने बाप्पाचा पाहुणचार केल्यानंतर तालुक्यांत सर्वत्र गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांचा उत्साह पाहायला मिळाला आहे.”गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढल्या वर्षी लवकर या” अशा गजरात फलटण येथील सार्वजनिक व घरगुती गणपती मूर्तींचे विसर्जन भक्तीभावाने करण्यात आले. फलटण शहर व तालुक्यात बाप्पाचं धुमधडाक्यात आगमन झालं होत. गेल्या दहा दिवसांपासून सर्वच ठिकाणी गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत…

Read More

बिबट्याच्या धास्तीने मंद्रुळकर काळजीत, वाढत्या उपद्रवाने शेतकरी चिंतेत, वनविभागाने पिंजरा बसविण्याची मागणी

ढेबेवाडी प्रतिनिधी :- ढेबेवाडी भागातील मंद्रुळकोळे खुर्द परिसरातील यादववाडी जवळच्या मराठी शाळेच्या बाजूच्या शिवारात सकाळी दोन बिबट्याची पिल्लं. गेल्याने लोकांच्या भितीचे वातावरण पसरले आहे. गावानजीकचा डोंगरात बिबट्याचा मुक्काम असल्याचे या घटनेवरून दिसून येत असल्याने येथील लोकांची चिंता वाढली आहे.वनविभागाने तातडीने त्या परिसरात पिंजरा बसविण्याची मागणीही होत आहे. गेली अनेक वर्षापासून या परिसरात बिबट्याचा वावर सातत्याने…

Read More

आयडियल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन

फलटण प्रतिनीधी :- आयडियल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या लक्ष्मीनगर व बिरदेवनगर या दोन्ही शाखांमध्ये आज गणपती बाप्पाचे आगमन अतिशय उत्साहात, भक्तिमय आणि मंगल वातावरणात संपन्न झाले. सकाळपासूनच शाळेच्या परिसरात आनंद, उत्साह आणि अध्यात्मिकतेचे वातावरण अनुभवायला मिळाले. संपूर्ण हॉल आकर्षक सजावट, सुंदर डेकोरेशनने सजवला होता. तसेच सर्व परिसरात रंगीत रांगोळी काढून सुशोभित करण्यात आला होता,…

Read More
error: Content is protected !!