कुसूर येथे कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण करून महाराष्ट्र कृषि दिन साजरा

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न दादासाहेब मोकाशी कृषी महाविदयालय, राजमाची ता.कराड येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव आणि कृषि औधोगिक संलग्न उपक्रमांतर्गत कुसूर (ता. कराड) येथे दि.1 जुलै या दिवसी वृक्षारोपण करून महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला. दरम्यान वसंतराव नाईक यांचे स्मरण तसेच वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रासाठी केलेले…

Read More

काळगाव परिसरातील करपेवाडी येथे रानडुकरे व गव्याकडून भात रोपांच्या तरव्याचे नुकसान

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- गव्यांचे लोंढेच्या लोंढे व रानडुक्करांचे कळप जंगलाबाहेर पडल्याने विभागातील डोंगर पट्ट्यासह इतर गावातील शेत कऱ्यांची झोपच उडाली असून काळगाव परिसरातील करपेवाडी येथील शेतकऱ्यांच्या भात पिकांच्या तरवाचे मोठ्या प्रमाणात गवे व डुक्करांनी तुडवून व खावून मोठे नुकसान नुकसान झाले आहे. वन विभागाने वन्यप्राण्याचा बंदोबस्त करावा व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या…

Read More

वेळ अन पैशाची बचत करणारी ड्रोन फवारणी आता खंडाळा, शिरवळ,लोणंद परिसरात उपलब्ध

शिरवळ प्रतिनिधी:- गेल्या काही वर्षापासून ऋतुमानात होत असलेल्या बदलाने पिकाला फवारणी करण्यास विलंब होत आहे. त्यातच पावसाने जरा उघडीप दिली तर फवारणीसाठी मजूर मिळेना. त्यामुळे आता शेतकरी ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीने फवारणी करण्याकडे वळत आहे. वेळ अन पैशाची बचत करणारी ड्रोन फवारणी आता खंडाळा, शिरवळ,लोणंद परिसरात उपलब्ध झाली आहे. ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट कृषी विज्ञान केंद्र बारामती…

Read More

खंडाळा तालुक्यातील ६३ ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत जाहीर

खंडाळा प्रतिनिधी – आज दिनांक४/७/२०२५ रोजी ११:०० वां पंचायत समिती खंडाळा येथील किसन वीर सभागृहात खंडाळा तालुक्यातील ६३ ग्रामपंचायत सरपंच पदाची २०२५-२०२३० आरक्षण सोडत उपजिल्हाधिकारी सातारा तथा निवडणूक निर्णय अधिकारी भगवान कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली खंडाळा तहसीलदार अजित पाटील यांनी तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींचे चिठ्ठीद्वारे जाहीर केले ते खालील प्रमाणे लोहोम -अनुसूचित जाती स्त्री, कवठे – अनुसुचित…

Read More

खळे नगरीत धुमधुमला हरी नामाचा गजर, प्राथमिक शाळेमध्ये आषाढीवारीचे आयोजन

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :-पंढरपूरची ‘वारी’ हा समता, बंधुता, एकतेचा संदेश देणारा सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे. यात कोणत्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा असण्यापूर्वी माणूस असणे आवश्यक बंधनकारक आहे. किंबहुना मूलभूत गरजच आहे.संत साहित्यातून नुसता ‘माणूस’च नाही तर ‘चांगला माणूस’ घडण्याची प्रक्रिया होत असते. जात, धर्म, पंथाच्या पलीकडे जाऊन ‘माणूस’ म्हणून सर्वांना एकत्र करीत समतेचे कार्य…

Read More

मालदनचे विद्यालय संरक्षक भिंतीच्या प्रतीक्षेत

तीन वर्षापूर्वी विद्यालयाच्या इमारतीत पाणी शिरून शैक्षणिक साहित्याचे झाले होते नुकसान ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- वांग नदीकाठी असलेल्या मालदन ता.पाटण येथील माध्यमिक विद्यालयाच्या शाळेला संरक्षक भिंत मिळणार कधी? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. तीन वर्षापूर्वी झालेल्या अतिवृष्टीत वांग नदीला आलेल्या पुरात येथील हायस्कूल उध्वस्त झाले होते.त्यावेळी अनेकांनी मदतीचा हात देवून हे विद्यालय सावरले.हे…

Read More

पाटण तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, खा. उदयनराजे यांचे तातडीने पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- पाटण तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, अनेक शेतकऱ्यांची शेती पडूनच आहे. काही जणांनी पेरण्या केल्या असल्या तरी सतत पडणाऱ्या पावसामुळे ती पिके कुजण्याच्या वाटेवर आहेत या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याचे खा. उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे स्पष्ट…

Read More

दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालया अंतर्गत वृक्षारोपण

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- उमरकांचन ता. पाटण या ठिकाणी दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय राजमाची ता. कराड यांच्या माध्यमातून 1 जुलै 2025 रोजी ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत कृषी दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने उमर कांचन या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ढेबेवाडी येथील वनाधिकारी अमर पन्हाळे त्यांचे सहकारी व विपुल गोडांबे, मोकाशी महाविद्यालयाचे प्राध्यापक अक्षय माने,…

Read More

तळमावले येथील निवारा शेडची दुरावस्था, विद्यार्थी तसेच प्रवासी यांना मिळेना आसरा

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- तुटके व गळके छप्पर, शेडमध्ये अस्वछता,बाकड्यांची झालेली दुरावस्था..तुटलेल्या खिडक्या,यामुळे तळमावले ता.पाटण येथील पिकअप शेड प्रवाशांसाठी असून अडचण आणि नसून खोळंबा बनले आहे. शहरीकरणाकडे वाटचाल सुरु असलेल्या तळमावले या ठिकाणची वर्षानुवर्षाची असणारी गैरसोय दूर होणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ढेबेवाडी – कराड मार्गावरील मुख्य रस्त्यावरील तळमावले बाजारपेठेचा झपाट्याने…

Read More

“सातारा जिल्ह्यामध्ये शेतीमध्ये प्रथमच होणार ए.आय तंत्रज्ञानाचा वापर”

शिरवळ प्रतिनिधी :-“ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट कृषी विज्ञान केंद्र बारामती” यांच्या माध्यमातून वाठार कॉलनी (भादे) येथे करण जगताप यांच्याकडे ऍग्रो नॉमिक्स एग्रीकल्चर ड्रोन सुविधा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. ड्रोन फवारणी मुळे शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणारे आहे, तसेच पिकावरील औषध देखील कमी लागणार असून सर्वात महत्वाचे एक एकरसाठी फक्त १० लिटर पाण्याचा वापर होत आहे त्यामुळे पाण्याची…

Read More
error: Content is protected !!