विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश

फलटण प्रतिनिधी :- विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज सी.बी.एस.ई वाघळवाडी येथे शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ चा माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून इयत्ता १०वी च्या परीक्षेत आदित्य पंडित याने ९९.२०% गुण मिळवत शाळेत प्रथम येण्याचा मान पटकावला. वेदांती भोसले ९८.८०% व शौर्य जगताप ९६.४० गुण प्राप्त केले.इयत्ता १२…

Read More

धक्कादायक! साखरवाडी येथे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी महिलांकडून पैसे, पालकमंत्री लक्ष देऊन कारवाई करणार का?

फलटण प्रतिनिधी :- साखरवाडी ता फलटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे दि ११ रोजी फलटण तालुक्यातील विविध गावांमधून ४० हुन अधिक महिला या प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आल्या होत्या या महिलांमध्ये ज्यांची सिझर पद्धतीने प्रसूती झाली आहे अशा महिलांकडून प्रत्येक सिझर साठी १ हजार या ‘दरानुसार’ वैद्यकीय अधिकारी…

Read More

नायब तहसीलदारांवर कारवाईसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना आक्रमक, कारवाई न झाल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा

फलटण प्रतिनिधी :- फलटण तहसिल कार्यालयातील संजय गांधी विभागात कार्यरत असणार्‍या नायब तहसीलदार श्रीमती भक्ती सरवदे – देवकाते त्यांच्यावर आठ दिवसांत कडक कारवाई न झाल्यास प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे तहसिल कार्यालय समोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्ष यांच्याकडून निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. प्रहार जनशक्ती पक्ष यांच्याकडून देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे…

Read More

यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्यु. कॉलेज फलटण येथे स्व.कर्मवीर भाऊराव पाटील यांचा स्मृतिदिन साजरा

फलटण प्रतिनिधी– यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे स्वर्गीय कर्मवीर भाऊराव पाटील यांचा ६६ वा स्मृतिदिन साजरा करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण, सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण, नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय फलटण व सौ वेणूताई चव्हाण डी फार्मसी…

Read More

फलटण येथे दि. १४ मे ते २५ मे दरम्यान श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सव

फलटण प्रतिनिधी :- श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठान, फलटणच्या वतीने श्रीमंत मालोजी राजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सव २०२५ चे आयोजन रविवार दिनांक १४ मे ते गुरुवार दिनांक २५ मे २०२५ पर्यंत करण्यात आले आहे. श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांची ४७ वी पुण्यतिथी दि. १४ मे २०२५ आणि माजी आ. श्रीमंत विजयसिंह मालोजीराजे नाईक निंबाळकर तथा श्रीमंत…

Read More

दि एम्रल्ड हाईट्स प्री स्कूल अँड अकॅडमी साखरवाडी मध्ये कामगार दिवस व महाराष्ट्र दिवस उत्सवात साजरा

l महाराष्ट्र माझा l फलटण प्रतिनिधी l दि.३ मे २०२५ l फलटण तालुक्यातील दी एम्रल्ड प्री स्कूल अँड अकॅडमी साखरवाडी गुरूवार दिनांक १ रोजी कामगार दिवस व महाराष्ट्र दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे उद्योजक पृथ्वीराज रणवरे व पिंपळवाडी विद्यालय माजी शिक्षिका सुरेखा पृथ्वीराज रणवरे उपस्थित होत्या. यावेळी प्रथमतः प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते…

Read More

श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर सेवकांची पतसंस्थेच्या चेअरमन पदी सुनील खरात तर व्हॉइस चेअरमन पदी कविता सस्ते यांची निवड

l महाराष्ट्र माझा l फलटण प्रतिनिधी l दि. २० एप्रिल २०२५ l फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर पतसंस्थेची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली असून यानंतर सर्व उपस्थित संचालका मधून चेअरमन पदी सुनील खरात व व्हॉइस चेअरमन पदी कविता सस्ते यांची निवड झाली. चेअरमन व व्हॉइस चेअरमन पदाच्या आयोजित निवड बैठकीत नवनिर्वाचीत संचालका मधून चेअरमन…

Read More

गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध ; चेअरमन पदी पुन्हा सचिन यादव यांची निवड

l महाराष्ट्र माझा l फलटण प्रतिनिधी l दि. १८ एप्रिल २०२५ l गॅलेक्सी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड फलटण ता. फलटण जि. सातारा या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणूक प्रक्रिया अध्यासी अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक श्री. जे.पी. गावडे साहेब व श्री. साळुंखे साहेब यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली. संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री. सचिन…

Read More

फलटण शहरात दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी दोन महिलांचे दागिने हिसकाविले

l महाराष्ट्र माझा l फलटण प्रतिनिधी l दि. १६ एप्रिल २०२५ l फलटण शहरात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी तरुणांनी हिसकावून नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या गुन्ह्यात दिनांक १४ रोजी…

Read More

फलटण येथील प्रसिद्ध घोड्याच्या यात्रेस प्रारंभ; यात्रेचा मुख्य दिवस दिनांक १८ एप्रिल रोजी

l महाराष्ट्र माझा l फलटण प्रतिनिधी l दि. १६ एप्रिल २०२५ l महानुभाव पंथाची दक्षिण काशी व ऐतिहासिक दृष्टीने महत्व प्राप्त झालेल्या श्री. क्षेत्र फलटण येथील घोड्याच्या यात्रेस म्हणजेच श्री चक्रपाणी प्रभू पालखी महोत्सव व यात्रेस प्रारंभ झाला असून शुक्रवार दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून हजारोच्या संस्थेने भाविक यात्रेस दाखल होत…

Read More
error: Content is protected !!