महावितरण कार्यकारी अभियंता प्रदीप ग्रामोपाध्याय यांच्या भरधाव कारच्या धडकेत एक महिला ठार, दोघे गंभीर जखमी

शिरवळ प्रतिनिधी:- फलटण महावितरण विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता प्रदीप प्रकाश ग्रामोपाध्याय यांच्या भरदाव कारने शिरवळ येथील क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या ग्राउंडसमोर समोर दुचाकीला धडक देऊन पादचारी महिलेला फरफटत नेले. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला तर कार्यकारी अभियंता प्रदीप प्रकाश ग्रामोपाध्याय यांच्यासह दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. याबाबत शिरवळ पोलीस ठाण्यातून व घटनास्थळी…

Read More

साखरवाडी येथे ताडीची चोरटी विक्री प्रकरणी एक जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

फलटण प्रतिनिधी:- मौजे साखरवाडी येथे घराचे आडोश्याला बेकायदा, बिगरपरवाना ताडीची चोरटी विक्री करत असल्या प्रकरणी एक जणांच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १८ रोजी मौजे साखरवाडी, ता. फलटण गावचे ह‌द्दीत वर्धमान मंगल कार्यालयाजवळ एका घराच्या आडोशाला उघड्यावर विजय अशोक लंभाते (रा. साखरवाडी, ता. फलटण, जि….

Read More

सरडे येथे दोघांना चाकुने मारहाण केल्या प्रकरणी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

फलटण प्रतिनिधी:- सरडे येथे गोठ्यातील शेण आमच्या शेतात का टाकले असे विचारले असता दोघांना लाथाबुक्क्यानी, कळकाच्या काठीने तसेच चाकुने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केल्या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दगडू रामचंद्र धायगुडे यांची सरडे येथील गट जमिन गट नं १०६ हि जमीन…

Read More

“डायल ११२” वरती प्राप्त तक्रारीवरून ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीकडे धारदार लोखंडी सत्तूर आढळून आल्या प्रकरणी गुन्हा दाखल

फलटण प्रतिनिधी:- पेट्रोलिंग करीत असताना डायल ११२ वरती प्राप्त तक्रारीवरून ताब्यात घेण्यात आलेल्या दारू पिलेल्या व्यक्तीकडे धारदार लोखंडी सत्तूर आढळून आल्या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिंनाक १५ रोजी रात्री ७:४२ वाजण्याच्या सुमारास पो.हवा अमोल रामदास जगदाळे,पोलीस उपनिरीक्षक जी. बी. बदने, पो.हवा नितिन चतुरे, हे…

Read More

चक्क ! फलटण पोलीस ठाण्याच्या समोर असणाऱ्या महिला समुउपदेशन केंद्रात चोरी

फलटण प्रतिनिधी:- जुन्या फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या समोर असणाऱ्या महिला समुउपदेशन केंद्राचा दरवाजा तोडून कार्यालयातील १८ हजार रुपये किंमतीच्या संगणक साहित्याची चोरी करण्यात आली आहे. या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, महिला समुउपदेशन केंद्र फलटण विभाग यांचे कार्यालय बारस्कर गल्ली, जुने फलटण ग्रामीण पोलीस…

Read More

धुमाळवाडी धबधबा येथील पर्यटकांना लुटणाऱ्या टोळीतील ३ आरोपींना अटक ७ आरोपी फरार

फलटण प्रतिनिधी:- फलटण तालुक्यातील प्रसिद्ध असणारा धुमाळवाडी धबधबा परिसरात धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना अडवून शस्त्राचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या टोळीतील ३ आरोपींना ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून ७ आरोपी फरार आहेत. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फलटण तालुक्यातील धुमाळवाडी धबधबा परिसरात दि. ८ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास धुमाळवाडी येथील धबधबा पाहुन काही…

Read More

वृद्ध नागरिकाचे पाकीट लंपास करून २८ हजार ९०० रुपयांची चोरी

फलटण प्रतिनिधी: – फलटण येथील एका वृद्ध नागरिकाचे अज्ञात चोरट्याकडून पाकीट लंपास करून पाकिटातील १५ हजार व एटीएम कार्ड वरून १३ हजार ९०० अशी २८ हजार ९०० रुपयांची चोरी करण्यात आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, फिर्यादी शिवाजी चंदरराव निकम…

Read More

जुन्या भांडणाच्या रागातून तीन जणांना अडवून मारहाण, सहा जणांच्या विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

फलटण प्रतिनिधी:- जुन्या झालेल्या भांडणाच्या रागातून तीन जणांना अडवून मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांच्या विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल असणाऱ्या फिर्यादीनुसार, फिर्यादी यश संतोष निंबाळकर ( रा कुरवली खुर्द ता फलटण जि सातारा) १२ वी मध्ये मुधोजी हायस्कूल व ज्यु. कॉलेज फलटण येथे शिक्षण घेत आहे….

Read More

धुमाळवाडी धबधबा परिसरात पर्यटकांना शस्त्राचा धाक दाखवून दहा जणांच्या टोळीने केली लूटमार

फलटण प्रतिनिधी:- फलटण तालुक्यातील प्रसिद्ध असणारा धुमाळवाडी धबधबा परिसरात धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना अडवून शस्त्राचा धाक दाखवून दहा जणांच्या टोळीने लूटमार केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे फलटण तालुक्यात खळबळ माजली आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, फिर्यादी राहुल भारत मंजरतकर (रा. जुन्या पोस्टाजवळ, सनगरगल्ली, शुक्रवार पेठ, फलटण, ता. फलटण, जि. सातारा) यांच्याकडे त्यांचे…

Read More

बांगलादेशी महिला फलटण मध्ये बेकायदेशीर वास्तव्यास, विविध नावांची कागदपत्रे सापडली

फलटण प्रतिनिधी :  भिलकटी, ता. फलटण येथे बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असलेली बांगलादेशी महिला पोलिसांना आढळून आली असून . काटून एम. एस. टी. एंजेला असे पासपोर्टवर त्या महिलेचे नाव असून तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.                याबाबत फलटण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना जिल्हा विशेष शाखेकडून फलटण तालुक्यात एक विदेशी महिला…

Read More
error: Content is protected !!