बकरी ईद पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक; अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण २६ मे २०२६: बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलीस ठाणे येथे शांतता समितीची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीस तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे तसेच पोलीस निरीक्षक अरविंद काळे उपस्थित होते.बैठकीत शांतता समिती सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, मोहल्ला कमिटी सदस्य, पत्रकार, गोरक्षक तसेच कत्तलखाना चालक उपस्थित…

Read More

फलटण शहर पोलिसांची मोठी कामगिरी; १२ लाखांचे ४० हरवलेले मोबाईल नागरिकांना परत

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण २६ मे २०२६ : सातारा जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमार्फत सी.ई.आय.आर. (CEIR) पोर्टलच्या सहाय्याने हरवलेले मोबाईल शोध मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत असून, फलटण शहर पोलिसांनी या मोहिमेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विविध राज्यांसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून तब्बल १२ लाख रुपये किंमतीचे ४० हरवलेले मोबाईल हस्तगत करून ते मूळ मालकांना परत देण्यात…

Read More

खाजगी वाहनांवर अवैध हूटर; फलटण शहरात वाहतूक नियमांचे खुलेआम उल्लंघन

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण प्रतिनिधी : खाजगी वाहनांना बेकायदेशीररीत्या सायरन, हूटर लावून शहरात सुसाट वेगाने फिरणाऱ्या काही वाहनचालकांविरोधात नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेषतः गर्दीच्या रस्त्यांवर, शाळा परिसरात आणि प्रमुख चौकांमध्ये भरधाव वेगाने धावणाऱ्या अशा वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढला असून शहर पोलिसांच्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. फलटण शहरात…

Read More

अल्पवयीन मुलीच्या बलात्कार व गर्भपात प्रकरणातील आरोपीचा मृत्यू! बारामती व फलटण तालुक्यात खळबळ

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क बारामती/फलटण प्रतिनिधी: बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर परिसरातील एका अल्पवयीन मुलीच्या बलात्कार व बळजबरीने फलटण येथे केलेल्या गर्भपात प्रकरणातील आरोपीचा आज पोलीस कोठडीत असतानाच मृत्यू झाला आहे. या घटनेने खळबळ उडाली असून सदर आरोपीने गळफास घेतल्याची माहिती मिळत असून पोलीसांकडून मात्र या संदर्भात अधिकृत माहिती मिळालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, १३ वर्षाची मुलगी…

Read More

फलटण-बारामती परिसरात संतापाचा उद्रेक :१३ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील अत्याचार, फलटण येथील डॉक्टरने केला गर्भपात

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण प्रतिनिधी :बारामती तालुक्यातील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील व्यक्तीकडून झालेल्या कथित लैंगिक अत्याचाराचे अत्यंत धक्कादायक प्रकरण उघडकीस आले असून, या घटनेने संपूर्ण फलटण-बारामती परिसरात संतापाची लाट उसळली आहे. केवळ अत्याचारच नव्हे, तर त्यानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने प्रकरण दडपण्यासाठी तिचा फलटण तालुक्यातील एका डॉक्टरने कथित गर्भपात केल्याची बाब…

Read More

सावकारीचा तगादा व आर्थिक छळाला कंटाळून ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची आत्महत्या; सहा जणांवर गुन्हा

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण प्रतिनिधी :- फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक रवींद्र लालासो खोपडे (वय ४२) यांनी सावकारीचा तगादा, आर्थिक फसवणूक तसेच फायनान्स व बँक अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त…

Read More

मंगळवार पेठ स्मशानभूमीजवळ अनोळखी तरुणाचा गळफास; फलटण शहर पोलिसांकडून तपास सुरू

फलटण प्रतिनिधी: फलटण शहरातील मंगळवार पेठ परिसरात असलेल्या स्मशानभूमीजवळ एका अनोळखी तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. ६ मार्च २०२६ रोजी सकाळी ७.४० वाजण्यापूर्वी मौजे फलटण येथील मंगळवार पेठ स्मशानभूमीजवळ आठमोरी कॅनॉल…

Read More

तडीपार गुंड शहरात खुलेआम वावरत; शहर पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण प्रतिनिधी : शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याने जिल्हा प्रशासनाने तडीपार केलेले काही गुंड पुन्हा फलटण शहरात खुलेआम वावरत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फलटण…

Read More

निरानदीत तरंगणाऱ्या मृतदेहामागील थरार उघड, प्रेमाच्या जाळ्यात ओढून २२ वर्षीय तरुणाचा खून; चार आरोपी अटकेत

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण प्रतिनिधी– गोखळी (ता. फलटण, जि. सातारा) गावच्या हद्दीत निरा नदीच्या पात्रात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर पोलिसांनी प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र सखोल तपासानंतर हा प्रकार खुनाचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. तपासादरम्यान…

Read More

फलटणमध्ये टोळक्याचा धारदार शस्त्रांनी दोन तरुणांवर खुनी हल्ला; दोन तरुण गंभीर जखमी

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण प्रतिनिधी:-फलटण शहरात रविवारी रात्री थरारक आणि धक्कादायक घटना घडली असून, शहराच्या मध्यवर्ती भागात १० ते १२ जणांच्या टोळक्याने दोन तरुणांवर धारदार शस्त्रे, दगड आणि काचेच्या बाटल्यांनी प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात अनिल हिरणवळे आणि संतोष हिरणवळे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या…

Read More
error: Content is protected !!