फलटणमध्ये शेतकरी व ग्रामपंचायतीच्या १०० एकर क्षेत्रावर फळबाग व देशी वृक्ष लागवड

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला उद्योग जगताचाही सकारात्मक प्रतिसाद

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

फलटण : पर्यावरणाचा समतोल राखणे आणि शेतकऱ्यांचे शेतीतून मिळणारे उत्पन्न वाढवणे या दोन्ही उद्दिष्टांना एकत्रित साध्य करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने विविध पर्यावरणपूरक व शाश्वत शेतीविषयक उपक्रम सुरू केले आहेत. या उपक्रमांना बळ देण्यासाठी फलटण तालुक्यात शेतकरी व ग्रामपंचायतीच्या पडीक, कमी कस व शेतजमिनींवर १०० एकर क्षेत्रावर फळबाग व देशी वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश जैवविविधतेचे क्षेत्र वाढवणे, शेतकऱ्यांना दीर्घकालीन उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देणे आणि पर्यावरण संवर्धनाला चालना देणे हा आहे.

🌱 मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हरित वृक्षलागवड वाढवून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे आणि पर्यावरणीय समतोल राखण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला ‘कमिन्स इंडिया फाऊंडेशन’ आणि ‘फार्मर्स फॉर फॉरेस्ट’ संस्थेने सकारात्मक प्रतिसाद देत संयुक्त उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांच्या उपजीविकेला बळकटी देणे आणि हरित परिसंस्था निर्माण करणे हा प्रमुख उद्देश आहे.

🌳 शेतकऱ्यांना अनुदान, तांत्रिक मार्गदर्शन व सुविधा

या संयुक्त कार्यक्रमांतर्गत कमिन्स इंडिया फाऊंडेशनच्या सहाय्याने शेतकऱ्यांना अनुदान तत्वावर दर्जेदार कलमी रोपे, देशी झाडांची रोपे, ठिबक सिंचन संच, माती परीक्षण, सेंद्रिय खते तसेच फळबाग लागवडीसाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन पुरविले जाणार आहे.या संपूर्ण कार्यक्रमाची अंमलबजावणी ‘फार्मर्स फॉर फॉरेस्ट’ संस्था करणार असून शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती आणि प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

🍋 फळझाडे व देशी वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड

या उपक्रमांतर्गत फलटण तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामपंचायतीच्या जमिनीवर विविध प्रकारच्या फळझाडांची व देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. त्यामध्येकेशर आंबा, साई सरबती लिंबू, आवळा, चिंच, कोकण बहाडोली जांभूळ, मोसंबी, बांबूतसेच देशी वृक्षांमध्येअर्जुन, कांचन, कदम, पिंपळ, ताम्हण, बकुळ इत्यादी झाडांचा समावेश आहे.या बागांमध्ये योग्य व्यवस्थापन करून आंतरपीके घेण्याचीही सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे, त्यामुळे अल्पकालीन व दीर्घकालीन दोन्ही प्रकारचे उत्पन्न मिळण्याची संधी निर्माण होणार आहे.

🌍 शाश्वत कृषी पद्धतीकडे महत्त्वाचे पाऊल

हा संयुक्त उपक्रम विस्तारक्षम (स्केलेबल) मॉडेल म्हणून राबविण्यात येत असून, भविष्यात इतर तालुक्यांमध्येही तो राबविता येणार आहे. पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी समाविष्ट करून शाश्वत व सक्षम कृषी पद्धतीकडे वाटचाल करण्याचा हा महत्त्वपूर्ण प्रयत्न मानला जात आहे.या उपक्रमातून स्थानिक शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून, समुदायस्तरावर स्वावलंबन, मालकीभावना आणि स्थैर्य निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे.

🌾 शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन लाभ

या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना दीर्घकालीन उत्पन्नाचा स्रोत मिळणार

पडीक व कमी कस जमिनीचा उपयोग वाढणार

पर्यावरण समतोल व जैवविविधता वाढणार

ग्रामीण भागात हरित आवरण वाढून हवामानावर सकारात्मक परिणाम होणार असे विविध लाभ अपेक्षित आहेत.

error: Content is protected !!