महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
फलटण प्रतिनिधी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दालवडी, ता. फलटण, जि. सातारा या शाळेने शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेतील इयत्ता चौथी व इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत कामगिरी करत शाळेच्या गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.
इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत सौम्या नाथा कोळवडकर – २६६ गुण, सिद्धी संदीप जाधव – २६६ गुण, विहान विनोद शिंदे – २२४ गुण, नव्या ईश्वर बनकर – २२४ गुण तसेच आरोही सचिन जाधव – २२८ गुण यांनी यश संपादन केले.इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत सार्थक नानासो शिंदे – १४८ गुण आणि सार्थक तानाजी कोळवडकर – १४४ गुण यांनी शिष्यवृत्ती पात्रता मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक जयवंत शिवराम सावंत, ग्रामसेवक वंदना गपाट उपशिक्षक भगवान रामचंद्र मदने, सीमा संजय कुमार बनकर, तसेच पदवीधर शिक्षक विनोद संपत गोडसे आणि तबस्सुम चंदुलाल मुलाणी यांचे मार्गदर्शन लाभले.
शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले.या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन, पालक, ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी नागरिकांकडून सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

