फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरची कथित सुसाइड नोट व्हायरल; एका माजी मंत्र्याच्या पी.ए विरोधात आरोप

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क

फलटण प्रतिनिधी : सोशल मीडियावर फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका डॉक्टर/कर्मचारी याने लिहिल्याचा दावा करण्यात आलेली कथित सुसाइड नोट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या नोटमध्ये संबंधित डॉक्टरने स्वतःवर झालेल्या कथित मानसिक त्रासाचा उल्लेख करत आत्महत्या करण्याचा इशारा दिल्याचे समोर येत आहे. या घटनेमुळे फलटण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

व्हायरल होत असलेल्या मजकुरानुसार बंदूक परवान्यासाठी आवश्यक असलेल्या फिटनेस प्रमाणपत्राच्या संदर्भात झालेल्या वादानंतर एका व्यक्तीकडून अरेरावी, धमकी आणि वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात योग्य कारवाई न झाल्यास आत्महत्येस प्रवृत्त व्हावे लागेल, असा उल्लेख कथित पत्रात असल्याचे दिसून येते.

आत्महत्या मजकुर खालील प्रमाणे

“उपजिल्हा रुग्णालय फलटण दिनांक 29/7/ 2026 विषय आत्महत्ये बाबत आगाऊ सूचना महोदय मी दोन वर्षापासून उपजिल्हा रुग्णालयात फलटण येथे कार्यरत आहे तरी मी दिनांक 29/8/2026 रोजी आत्महत्या करणार आहे कारण काल संध्याकाळी 7 पी.एम. ला माजी मंत्री **** यांचा पी.ए **** बंदूक लायसन साठी फिटनेस घ्यायला आला होता तर मी बोललो इमर्जन्सी फिटनेस नाही मिळणार तर त्याने एम.एस मदने मॅडमचा नंबर मागितला असता मी दिला नसल्याने एम.एस कडे माझी तक्रार केली एम.एस ने फिटनेस सर्टिफिकेट डिटेल्स व मला ऑफिसला बोलवले तेव्हा तो *** ने अरे तुरे करून बोलला मग मी पण बोललो तर त्यावेळेस त्याच्या बॉडीगार्डने माझी कॉलर धरून मारण्याची धमकी दिली व *** ने मी तुला उद्या कोण आहे ते कळेल असं बोलून गेला तर आज सायंकाळी सिविल वरून माझे पत्र काढून मला तिकडे चौकशीसाठी बोलवले आहे तरी योग्य कार्यवाही न झाल्यास मी 29/8/2026 रोजी आत्महत्या करेन तुकाराम मुंडे सारख्या प्रामाणिक राहायचं ही शिक्षा डॉक्टर संपदा मुंडे यांना पण असंच चौकशीला समोर जावे लागले त्यानंतर काही दिवसात आत्महत्या केली कारण आता पण हॉस्पिटल मधून कोणीही माझ्या बाजूने नाही शेवटची इच्छा तुकाराम मुंढे सरांच्या कामी पडण्याची संधी मिळावी” असे आशयाचे एक डायरी नोट वायरल होत असून याचबरोबर डाव्या हातावर संशयित मृत्यू झाल्यास जबाबदार व्यक्ती ******असे डाव्या हातावर लिहिलेला मजकूर फोटो सोशल मीडियावर ही व्हायरल होत आहे.

मात्र, या कथित सुसाइड नोटची सत्यता, ती प्रत्यक्ष संबंधित डॉक्टर/कर्मचारी लिहिली आहे का, तसेच त्यामधील आरोपांबाबत अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तसेच संबंधित व्यक्ती, उपजिल्हा रुग्णालय प्रशासन, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय किंवा पोलिस प्रशासनाकडून याबाबत अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.

प्रकरणाची सत्यता समोर येण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अधिकृत माहिती उपलब्ध झाल्यानंतरच या प्रकरणातील तथ्य स्पष्ट होणार आहे.

error: Content is protected !!