“गोविंद चषक” क्रिकेट स्पर्धेचे तिसरे पर्व; राज्यभरातील संघांचा सहभाग

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क

फलटण प्रतिनिधी :-फलटण एज्युकेशन सोसायटी आणि क्रिकेट अकॅडमी ऑफ चॅम्पियन्स यांच्या संयुक्त विद्यमाने “गोविंद चषक” अंतर्गत १२ वर्षांखालील (U-12) व १४ वर्षांखालील (U-14) गटांसाठी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. ३ मे ते २० मे २०२६ या कालावधीत श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल, शिंगणापूर रोड, फलटण येथे पार पडणार असून, यंदा या स्पर्धेचे तिसरे पर्व साजरे होत आहे.

सातारा जिल्ह्यात U-12 गटासाठी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करणारा हा पहिलाच उपक्रम ठरत असून, यामुळे लहान वयातील खेळाडूंना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.या स्पर्धेत राज्यभरातील नामांकित क्रिकेट अकॅडमींचा सहभाग असून, अंडर-12 गटासाठी ड्रॉ (सोडत) जाहीर करण्यात आला आहे.

अंडर-12 गट :गट अ : क्रिकेट अकॅडमी ऑफ चॅम्पियन्स ‘बी’, अजित वाडेकर क्रिकेट अकॅडमी, क्रिकेट अकॅडमी ऑफ चॅम्पियन्स ‘ए’, नेरळकर क्रिकेट अकॅडमी, औरंगाबाद

गट ब : प्रोफेशनल क्रिकेट अकॅडमी, सातारा, क्रिकेट अकॅडमी ऑफ चॅम्पियन्स ‘सी’, राजस्थान रॉयल्स क्रिकेट अकॅडमी, बारामती स्मॅशर्स

अंडर-14 गट :गट अ : सारा क्रिकेट अकॅडमी, क्रिकेट अकॅडमी ऑफ चॅम्पियन्स ‘सी’, मिलिंद गुंजाळ स्पोर्ट्स अकॅडमी, बारामती स्मॅशर्स, राजस्थान रॉयल्स क्रिकेट अकॅडमी

गट ब : रायझिंग क्रिकेट अकॅडमी, नेरळकर क्रिकेट अकॅडमी, औरंगाबाद, क्रिकेट अकॅडमी ऑफ चॅम्पियन्स ‘ए’, क्रिकेट अकॅडमी ऑफ चॅम्पियन्स ‘बी’, प्रोफेशनल क्रिकेट अकॅडमी, सातारा

या गटांमधून पुढील फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे.स्पर्धेची ड्रॉ प्रक्रिया श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते पार पडली. यावेळी फलटण पंचायत समितीचे उपसभापती अमोल सस्ते, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेवराव माने, तसेच अरविंद निकम (सर), दशरथराव नाईक निंबाळकर, अशोक गाडगीळ, आर्यन गाडगीळ, अवि कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेमुळे ग्रामीण व शहरी भागातील तरुण क्रिकेटपटूंना आपली गुणवत्ता दाखवण्याची मोठी संधी मिळणार असून, भविष्यातील गुणवंत खेळाडू घडविण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!