महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
फलटण प्रतिनिधी: क्रीडा, आरोग्य आणि सामाजिक एकतेचा अनोखा संगम घडविणारी तसेच फलटणच्या वैभवात भर घालणारी ‘आपली फलटण मॅरेथॉन २०२६’ यंदा आपल्या १०व्या वर्षात पदार्पण करत आहे. या ऐतिहासिक मॅरेथॉनचे आयोजन रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी सजाई गार्डन, फलटण येथे करण्यात आले आहे.
जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटणचे सर्वेसर्वा डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या मॅरेथॉनला यंदाही उत्स्फूर्त आणि विक्रमी प्रतिसाद मिळाला आहे. विविध वयोगटातील सुमारे २५०० स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती डॉ. प्रसाद जोशी यांनी दिली.मान्यवरांची उपस्थिती; अभिनेता समीर धर्माधिकारी ठरणार प्रमुख आकर्षणयंदाच्या मॅरेथॉनचा शुभारंभ सोहळाही विशेष आकर्षणाचा ठरणार आहे.
विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून स्पर्धकांना शुभेच्छा देणार आहेत. स्पर्धेनंतर होणाऱ्या बक्षीस वितरण समारंभात प्रसिद्ध चित्रपट व नाट्य अभिनेते समीर धर्माधिकारी तसेच त्यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर सौ. अपर्णा धर्माधिकारी यांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.यावेळी विविध गटांतील विजेत्यांना सुमारे ६० आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत.
पाच विविध गटांत होणार मॅरेथॉनफलटणकरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ‘आपली फलटण मॅरेथॉन’ ही केवळ स्पर्धा न राहता आता फलटणचा एक क्रीडा आणि आरोग्य उत्सव बनली आहे. यंदा पाच विविध गटांत स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
२१ कि.मी. हाफ मॅरेथॉन – २०० स्पर्धक(१५० पुरुष + ५० महिला)१० कि.मी. चॅलेंज रन – ४०० स्पर्धक(३०० पुरुष + १०० महिला)५ कि.मी. ड्रीम रन – ४०० स्पर्धक(२५० पुरुष + १५० महिला)३ कि.मी. फन रन – ५०० स्पर्धक(३०० पुरुष + २०० महिला)३ कि.मी. वॉकेथॉन – ५०० स्पर्धक(६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी)रोबोटिक सांधेरोपण झालेल्या ७५० हून अधिक रुग्णांची विशेष वॉकेथॉनयंदाच्या मॅरेथॉनचे सर्वात मोठे आणि प्रेरणादायी वैशिष्ट्य म्हणजे रोबोटिक सांधेरोपण (बिंदू रोबो) शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांसाठी आयोजित करण्यात आलेली विशेष ३ कि.मी. वॉकेथॉन.जोशी हॉस्पिटलमध्ये रोबोटिक पद्धतीने सांधेरोपण शस्त्रक्रिया झालेल्या ७५० हून अधिक रुग्णांचा या आगळ्यावेगळ्या वॉकेथॉनमध्ये सहभाग राहणार आहे.
सांधेरोपण झालेल्या रुग्णांसाठी अशा प्रकारची वॉकेथॉन आयोजित करण्याचा हा अभिनव उपक्रम असून, आरोग्य क्षेत्रात रुग्णांना पुन्हा सक्रिय जीवनशैलीकडे प्रेरित करणारा हा उपक्रम ठरणार आहे.क्रीडा, आरोग्य, सामाजिक बांधिलकी आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देणारी ‘आपली फलटण मॅरेथॉन २०२६’ यंदा आपल्या दशकपूर्तीच्या वर्षात भव्य स्वरूपात पार पडणार असून, फलटणच्या क्रीडा आणि आरोग्यविषयक उपक्रमांच्या वाटचालीत या सोहळ्याची विशेष नोंद होणार आहे

