स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ‘राज इन्फ्रास्ट्रक्चर’कडून विनम्र अभिवादन

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध ठिकाणी अभिवादनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर ‘राज इन्फ्रास्ट्रक्चर’च्या वतीने स्व. अजितदादा पवार यांच्या पवित्र स्मृतींना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

यावेळी कंपनीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या संदेशात, “तुम्ही आमच्यासोबत होता, आजही आहात, अशीच भावना आहे. तुमचा प्रत्यक्ष सहवास जरी नसला तरी तुमचे विचार, कार्यशैली आणि नेतृत्वाचा वारसा आम्हाला सतत प्रेरणा देत राहील,” अशा शब्दांत स्व. अजितदादा पवार यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

यासोबतच स्व. अजितदादा पवार यांचा विकासाभिमुख दृष्टीकोन, जनसामान्यांप्रती असलेली बांधिलकी आणि लोकहितासाठी केलेले कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

‘राज इन्फ्रास्ट्रक्चर’च्या वतीने स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यांच्या विचारांचा आणि विकासाच्या ध्यासाचा वारसा समाजाला प्रेरणा देत राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

error: Content is protected !!