
फलटण नगर परिषद पाणी पुरवठा विभागाच्या बेताल कारभारामुळे शहरातील नागरिक त्रस्त
फलटण प्रतिनिधी:- फलटण नगर परिषद पाणी पुरवठा विभागाच्या बेताल कारभारामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या समस्यांचे निरसन होत नसल्याने नागरिकांमध्ये नगर परिषदेच्या विरोधात असंतोष खदखदत आहे. एक एक दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून विविध कारणामुळे शहरातील पाणीपुरवठा सतत ठप्प होत आहे. वॉल फुटला आहे, ट्रान्सफॉर्मर जळला…