फलटणच्या मुलींच्या हॉकी संघाने पटकावले सलग तिसऱ्यांदा राज्यस्तरीय विजेतेपद
फलटण :- इस्लामपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय १४ वर्षाखालील मुलींच्या हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूल, फलटणच्या संघाने कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करत नेत्रदीपक विजय मिळवला आहे. या संघाने सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावून फलटण नगरीच्या इतिहासात मानाचा तुरा रोवला आहे. या यशामध्ये १४ वर्षाखालील सर्व मुलींचा उत्साह, पालकांचे सहकार्य, आणि सिनियर खेळाडूंच्या प्रेरणादायी भूमिकेचा मोठा वाटा आहे….