फलटण नगर परिषदेच्या विशेष सभेत २१ विषयांना मंजुरी; पालखी सोहळ्याच्या तयारीसह विकासकामांना गती
महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण | प्रतिनिधी | ३० जून २०२६ फलटण नगर परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत आगामी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीसह शहरातील विविध विकासकामांशी संबंधित एकूण २१ विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. सभेतील सर्वाधिक चर्चेचा विषय सगुणामाता नगर येथील साई मंदिरासमोरील ‘रामराजे उद्यान’…

