
सैफ अली खान याच्यावर जीवघेणा हल्ला, घरात घुसून चाकूने केले सहा वार
मुंबई : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. पहाटे साडेचारच्या सुमारास चोरट्याने चोरीच्या उद्देशाने प्रवेश केला होता. सैफवर 6 वार करण्यात आले आहेत. हात, मान आणि पाठीच्या मणक्यात वार झाले आहेत. माहितीनुसार सैफवर वार करणाऱ्या चोराचं सैफच्या मोलकरणीसोबत भांडण झालं. सैफ तिला वाचवण्यासाठी पुढे आला आणि चोरट्याने त्याच्यावर चाकूने हल्ला केला….