खंडाळा भूमी अभिलेख असून अडचण नसून खोळंबा, नागरिकांतून प्रचंड नाराजी

खंडाळा प्रतिनिधी:- भूमी अभिलेख कार्यालय खंडाळा या कार्यालयात आज रोजी केवळ दोनच कर्मचारी असून लोकांनी आपल्या कामासाठी रोज भूमी अभिलेख कार्यालयात हेलपाटे घालून जनता वैतागले आहे. कोणाचे नकाशे काढायचे आहेत तर कुणाला स्कीम काढायचे आहे,तर कोणाला कोर्टात भूमिअभिलेखचे कागदपत्र द्यायचे आहेत तर या कार्यालयात येणाऱ्या लोकांना केवळ एकच उत्तर ते बाहेर गेलेत, कर्मचारी कमी आहेत…

Read More

सेवा सहयोग फाऊंडेशन वतीने गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार, शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

फलटण प्रतिनिधी-आर्थिक दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या पंखात ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’ या संस्थेने मोठे बळ भरले आहे. संस्थेच्या माध्यमातून गेल्या १७ वर्षांत राज्यभरातील २ हजार ३९६ गरजू विद्यार्थ्यांना २७ कोटी ३१ लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप केले आहे. संस्थेने इंजिनीयरिंग आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांसह अन्य व्यावसायिक शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांची पूर्ण फी भरलेली आहे.दहावीमध्ये ९० टक्के आणि बारावीमध्ये ७० टक्के…

Read More

श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी संदर्भामध्ये भाजपा प्रदेश अध्यक्ष व प्रभारी अध्यक्ष यांना अहवाल सादर

बारामती प्रतिनिधी:- भाजपा प्रदेश अध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे व प्रभारी अध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण यांची भेट घेऊन नुकत्याच झालेल्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी संदर्भामध्ये सविस्तर अहवाल सादर केला. निवडणुकी मधे पॅनेलला मिळालेली मते महत्वपूर्ण असून अशा कठीण परिस्थितीमध्ये पॅनेल उभा करण्याचा धाडस केल्याबद्धल दोन्ही नेत्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस पक्ष खंबीरपणे पाठीशी…

Read More

ग्राम विकासाचा आधुनिक पॅटर्न दाखविणारा अवलिया… चंद्रकांत दळवी

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील ‘निढळ’ हे छोटेसे खेडेगाव. येथील लोकांचे जगण्याचे एकमेव साधन म्हणजे शेती. तीही पावसावर अवलंबुन असणारी. त्यामुळे ज्वारी, बाजरीसारख्या जिरायती पिकांतून जे उत्पन्न मिळेल तेच येथील लोकांच्या जगण्याचे साधन. दुष्काळ हा पाचवीलाच पुजलेला. अशा अवस्थेत शेतीवर संपूर्ण कुटुंब चालविणे अवघड असल्यामुळे कुटुंबातील एक तरी माणूस कामानिमित्त पुणे-मुंबई सारखी शहरे जवळ करत…

Read More

संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून पहाणी

फलटण : संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची संख्या मोठी असणार आहेत. वारकऱ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी प्रत्येक विभागाने सुक्ष्म नियोजन करावे. वारकऱ्यांच्या सोयी सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी बरड, फलटण, तरडगाव, लोणंद, निरा…

Read More

फलटण तालुक्यातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे न झाल्याने शेतकरी चिंतेत

फलटण प्रतिनिधी :- फलटण तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन नुकसान शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते नुकसानीचे पंचनामे होतील व भरपाई मिळेल या आशेत फलटण तालुक्यातील शेतकरी वाट पाहत होता परंतु भरपाईसाठी पंचनामे करण्यासाठी तलाठी व मंडलाधिकारी तसेच इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे बांधावर पोहचले नाहीत शेतकऱ्यांनी याबाबत गावातील तलाठ्यांशी संपर्क साधला…

Read More

5 लाख घेताना उपजिल्हाधिकाऱ्यास रंगेहात अटक,शेतजमीनच्या कामात 23 लाख घेतले

छ. संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये चक्क निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांस अटक करण्यात आली आहे. तब्बल 5 लाख रुपयांची लाच घेताना एसीबीने आरडीसी महोदयांना रंगेहात अटक केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील आरडीसी म्हणजेच निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना 5 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अटक करण्यात आली आहे. अव्वल कारकुनामार्फत ही लाच घेण्यात येत असताना अटक करण्यात आली असून…

Read More

श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर सेवकांची पतसंस्थेच्या चेअरमन पदी सुनील खरात तर व्हॉइस चेअरमन पदी कविता सस्ते यांची निवड

l महाराष्ट्र माझा l फलटण प्रतिनिधी l दि. २० एप्रिल २०२५ l फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर पतसंस्थेची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली असून यानंतर सर्व उपस्थित संचालका मधून चेअरमन पदी सुनील खरात व व्हॉइस चेअरमन पदी कविता सस्ते यांची निवड झाली. चेअरमन व व्हॉइस चेअरमन पदाच्या आयोजित निवड बैठकीत नवनिर्वाचीत संचालका मधून चेअरमन…

Read More

फलटण ग्रामीण पोलीसांनी १०.३० किलो गांजा केला जप्त, कारवाईत पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने जखमी

l महाराष्ट्र माझा l फलटण प्रतिनिधी l दि. १६ एप्रिल २०२५ l साखरवाडी ता फलटण गावाच्या हद्दीत दिनांक १४ एप्रिल रोजी सकाळी ६.२० वाजण्याच्या सुमारास स्वतःचा जीव धोक्यात घालून फलटण ग्रामीण पोलीसांनी गांजा वाहतुक करणारी एक चार चाकी पकडून त्यामधून १०.३० किलो गांजा व चार चाकी असा ५ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत…

Read More

एस.ई.ए(एम एस ई बी)को – ऑप. क्रेडिट सोसायटी लि.,पुणे सोसायटीच्या “सचिव” पदी रविंद्र ननवरे यांची तर “खजिनदार” पदी कल्याण जाधव यांची निवड

पुणे प्रतिनीधी:-एस.ई.ए(एम एस ई बी)को – ऑप. क्रेडिट सोसायटी लि.,पुणे सोसायटीच्या “सचिव” पदी संचालक रविंद्र ननवरे यांची तर “खजिनदार” पदी संचालक कल्याण जाधव यांची निवड करण्यात आली आहे. एस.ई.ए(एम एस ई बी)को – ऑप. क्रेडिट सोसायटी लि.,पुणे सोसायटीच्या रिक्त सचिव व खजिनदार या पदासाठी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे यांच्या…

Read More
error: Content is protected !!