पवारवाडी( कुठरे) येथे काल रात्री घरपोडी, चोरट्यांकडून 7 लाख 82 हजार किंमतीचा सोन्याचा ऐवज लंपास
ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- पावरवाडी कुठरे ता. पाटण येथे राहत्या घरी चोरी करून अज्ञात चोरट्याने 7 लाख 82 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पावरवाडी (कुठरे) येथील दिनकर कृष्णा पवार यांचे राहते घरी बुधवारी रात्री साडेसहा ते पावणे दहा दरम्यान अज्ञात चोरट्याने घराच्या पाठीमागील दरवाज्याची कडी कोयंडा तोडून घराच्या पाठीमागील खोलीत असलेल्या…

