शहीद जवानाच्या कुटुंबाला माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा आधार; मुलगी श्रीशाच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेण्याची ग्वाही
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण प्रतिनिधी – फलटण तालुक्यातील बरड (ता. फलटण) गावचे सुपुत्र तथा भारतीय सैन्याच्या ११५ इंजिनिअर रेजिमेंटचे जवान नायक विकास विठ्ठलराव गावडे यांनी देशसेवेसाठी आपल्या प्राणांची आहुती दिल्यानंतर संपूर्ण तालुक्यासह राज्यभरातून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या वीरमरणाने गावडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या कुटुंबाला धीर देण्यासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था व…

