लाडक्या बहिणींना दिलासादायक बातमी; ई-केवायसी दुरुस्ती पोर्टल पुन्हा सुरू, 31 मार्चपर्यंत मुदत
महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थी महिलांसाठी राज्य शासनाने दिलासादायक निर्णय घेतला आहे. ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान झालेल्या त्रुटींमुळे अडकलेले लाभ पुन्हा सुरू व्हावेत, यासाठी शासनाने ई-केवायसी दुरुस्तीचे ऑनलाईन पोर्टल पुन्हा सुरू केले असून लाभार्थी महिलांना 31 मार्च 2026 पर्यंत आवश्यक सुधारणा करता येणार आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून राज्यातील अनेक…

