नीरा नदीवरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक, प्रशासनाचे दुर्लक्ष
खंडाळा प्रतिनिधी – वीर धरण क्षेत्रामध्ये असणारा नीरा नदीवरील अरुंद पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. याबाबत स्थानिक नागरिक व वीर ग्रामपंचायतीच्या वतीने वारंवार पुलाची उंची वाढवून संरक्षक कठडे बसविण्याची मागणी केलेली आहे. मात्र संबंधित विभागाकडून याकडे कायम दुर्लक्षच केले जात आहे. या पुलाच्या एका बाजूला पुरंदर तालुक्याची हद्द आहे तर दुसऱ्या बाजूला खंडाळा तालुक्याची हद्द…

