जानुगडेवाडी ता. पाटण येथील वळणावर एस. टी. बसला अपघात, अपघातात तीस जण जखमी

ढेबेवाडी प्रतिनिधी -महेश जाधव :- ढेबेवाडी सणबूर मार्गावर समोरून आलेल्या खासगी बसला वाचविताना पाटण आगाराची सळवे पाटण एस.टी. बस क्र. MH 14 BT 1127 वरील चालकाचा ताबा सुटून बस झाडावर धडकल्याने ३० जण जखमी झाले.

जानुगडेवाडी जवळील धोकादायक वळणावर हा अपघात झाला. जखमींमध्ये शालेय विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. चार जण गंभीर असल्याने त्यांना कराड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर इतर जखमींवर ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याबाबत माहिती अशी, पाटण डेपोची एसटी बस सळवे येथून पाटणकडे निघाली होती. दरम्यान, जानुगडेवाडीजवळ ढेबेवाडी कडून येणारी खासगी प्रवासी बस अचानकपणे समोरुन आल्याने बस चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याकडेच्या झाडावर धडकली.

यामध्ये बस चालकासह तीस जण जखमी झाले. जखमींमध्ये चालक आरिफ निजाम मुल्ला (वय-५७ रा. कोळे), वाहक आर. एम. काळे (५७ रा.मालदन), सरिता धनाजी जाधव (वय ५३) सीताबाई नायकु मगरे (६१) रंजना सुरेश मगरे (५८) बाळाबाई शिवाजी मगरे (५८) शोभा भगवान मगरे (५०) निर्मला अशोक मगरे (४२) शोभा परशुराम जाधव (६५) शारदा सोनवणे (५०) छाया तानाजी जाधव (४४) धनाजी अंतू जाधव (५८, सर्व रा. सणबूर ता.पाटण), तुकाराम ज्ञानू भाईगडे (५९), तुकाराम गणपती यादव (५०) संपदा हनुमंत पुजारी (५०), शारदा सुरेश परीट (५०), यश जालिंदर बोरगे (१७) रोहिणी राजाराम गुरव (सर्व रा. सळवे), जिजाबाई जयसिंग चोरगे (७०), सुमन वसंत चोरगे (६०, सर्व रा. शिंदेवाडी),कमल शिवाजी जगदाळे (६०), बाळू नाना साळुंखे (५६), पल्लवी सुमित पवार (२६), सीताबाई वसंत लोहार (५०), श्रावणी सतीश पाटील (१५), आराध्या सतीश पाटील (१३), प्रगती रवींद्र पाटील (१५), समर्थ विक्रम जगदाळे (१९, सर्व रा. बनपुरी) मालन बाळासो साळुंखे (६४), जया बाळासाहेब साळुंखे (६८ सर्व रा. महिंद) यांचा समावेश आहे.

यापैकी निर्मला अशोक मगरे, पल्लवी अमित पवार, संभाजी सिताराम कुंभार हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कराडला हलवण्यात आले आहे. अपघाताची नोंद ढेबेवाडी पोलीस ठाण्यात झाली आहे. अपघातानंतर जखमींच्या मदतीसाठी नागरिकांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!