खंडाळा भूमी अभिलेख असून अडचण नसून खोळंबा, नागरिकांतून प्रचंड नाराजी

खंडाळा प्रतिनिधी:- भूमी अभिलेख कार्यालय खंडाळा या कार्यालयात आज रोजी केवळ दोनच कर्मचारी असून लोकांनी आपल्या कामासाठी रोज भूमी अभिलेख कार्यालयात हेलपाटे घालून जनता वैतागले आहे. कोणाचे नकाशे काढायचे आहेत तर कुणाला स्कीम काढायचे आहे,तर कोणाला कोर्टात भूमिअभिलेखचे कागदपत्र द्यायचे आहेत तर या कार्यालयात येणाऱ्या लोकांना केवळ एकच उत्तर ते बाहेर गेलेत, कर्मचारी कमी आहेत जे कर्मचारी आहेत ते चिरीमिरी साठी लोकांना नाहक त्रास देत आहेत. अशा ह्या भूमि अभिलेख कार्यालयाला बंद केलेलेच बरे अशा लोकांच्या भावना आहेत.

जर अशा प्रकारे लोकांना त्यांच्या कामासाठी त्रास होत असेल तर एक दिवस भूमी अभिलेख कार्यालयात लोकांकडून उद्रेक होऊ शकतो. येथील काही कर्मचारी फक्त पगार घेण्यापुरते खुर्च्या उबवण्याचे काम करत आहेत.शासन शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवत आहे पण कर्मचारी जनतेची कामे करत नाहीत, काही कर्मचारी तर दोन शेतकऱ्यांच्या हद्दीवरून वाद असेल आणि त्यांचे मोजणे कारवयाची असल्यास जाणून बुजून हत्तीच्या खुणा न दाखवता त्या दोन शेतकऱ्यांना अलग अलग घेऊन एकमेकांच्या विरोधात भडकाऊन देतात आणि त्यांच्या त भांडणे कशी होतील याची वाट बघत बसतात. काही ठिकाणी चुकीच्या मोजण्या करून दोन शेतकऱ्या ंत वाद लावून देण्याचे काम हे भूमी अभिलेख कर्मचारी करत आहेत तर काही ठिकाणी, भूमापन क्रमांक १,२,३,४,५, असे असताना मध्येच २०,२१ गटाची मोजणी करून जाणून बुजून चुकीची मोजणी दाखवून त्यावर मोजणी खोटीचे कारण अभिलेखातील तफावत किंवा हद्दीतील क्षेत्र आणि अभिलेखातील क्षेत्रातील तफावत असे करून दाखवून मोजणे न करणे किंवा हद्दीन दाखवणे त्यातून दोन शेतकऱ्या ंत बांधणे कसे लागतील हेच खंडाळा तालुक्यातील भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे मुख्य काम आहे.

काही भांडवलदार व्यक्ती चिरीमिरी देऊन आपले काम करून घेत असतात शिवाय अशा व्यक्तींना भूमि अभिलेख कार्यालयातील शिपायांमार्फत नकाशे आर्थिक मोबदला घेऊन त्यांना भूमी अभिलेख कार्यालयातील ओरिजनल नकाशे झेरॉक्स काढण्यासाठी म्हणून दिले जातात पण ती व्यक्ती परत तो ओरिजनल नकाशे भूमी अभिलेख कार्यालयाला परत आणून देत नाही त्यामुळे तोच नकाशा त्याच गावातील इतर लोकांनी मागितला असता आमच्याकडे उपलब्ध नाही, कागदाचे तुकडे झालेले दाखवले जाते, अशा प्रकारे भूमि अभिलेख कार्यालयातील शिपाई वर्ग भांडवलदारांना मदत करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना नाहक त्रास देण्याचे काम करीत आहे.

error: Content is protected !!