महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
फलटण :- फलटण शहरात पोलिसांच्या कृपेने अवैध व्यवसायिकांनी चांदी होत असून सर्वसामान्य नागरिकांची लुट होत असून शहरात अवैध व्यवसायांचा खुले आम बाजार सुरु आहे. फलटण शहरातील अनेक परिसरात मटक्याबरोबर चक्रीने अवैध व्यवसायात पदार्पण केल्याने तरूणाईचे जीवन उद्धवस्त होत आहे. आठ तास रोजदारीमध्ये काबाडकष्ट करुन कमाविलेला पैसा तरुणाई जुगार मटक्यावर उडवत असल्याने अनेकांचे प्रपंच धुळीस मिळुन जुगारात पैसे हारलेली तरुणाई नैराश्याने व्यसनाधीन होत असल्याचे चित्र शहर परिसरात वाढु लागले आहे.
शहरातील अनेक परिसरात अवैध व्यवसायांनी पोलिसांच्या आशिर्वादाने चांगलेच बस्तान बसवले असून कल्याण- मुंबई मटक्याबरोबर चक्रीमुळे तरुणाई आर्थिक दृष्टीने कंगाल होवुन व्यसनाधीनतेमुळे अनेकांचे प्रपंच धुळीस मिळत आहे. फलटण शहर परिसर अवैध व्यवसायांचे माहेर घर बनले आहे. शहरातील काही युवकांनी आर्थिक देवाणघेवाण मधून पोलिसांच्या मदतीने फलटण तालुक्यात तसेच शहरात अनेक चक्री जुगार चे अड्डे सुरू झाले असून खाल पासून वर पर्यंत हजारोंची पाकिटे पोहचवून चक्री जुगार मध्ये चांगलाच जम बसविला आहे.
फलटण तालुक्यातील जर कोणाला बक्कळ पैसा मिळवण्यासाठी नवीन चक्री जुगार सुरू होत असून आयडी व कामगार देऊन नवीन नवीन ठिकाणी खुलेआम चक्रीचे अड्डे सुरू होत आहेत.फलटण तालुक्यात शहरात अशाच चक्री जुगार अड्यावर तरुणांची चांगलीच येजा असून ऑनलाइन स्वरूपात लागणारा हा चक्री जुगार अनेक जणांची संसाराची राख रांगोळी करत आहे.
फलटण शहरात खुल्या आम सुरू असणाऱ्या या चक्री अड्यावर आजपर्यंत एकदाहि पोलिस कारवाई झाली नसल्याने मोठे आश्चर्य व्यक्त होत असून तासाला लाखो रुपयाची उलाढाल करणारा हा चक्री जुगार व्यवसाय फलटण शहरात कोणाच्या आशीर्वादाने खुलेआम सुरू आहे त्याचा उलघडा होण्याची गरज आहे.प्रत्येक मिनिटाला ऑनलाईन पद्धतीने निकाल लागणारा हा चक्री जुगार अड्यावर एका ऑनलाईन स्क्रीनवर निकाल जाहीर होतो तत्पूर्वी टेबलवर 1 ते 10 नंबर पैकी एका नंबरवर पैसे लावले जातात व काही सेकंदात ऑनलाईन पद्धतीने नंबर जाहीर होतात.
साधारण साठ मिनिटात साठ निकाल या चक्री जुगार मध्ये लागतात असा दिवसभर हा ऑनलाईन चक्रीचा लाखोंचा खेळ सुरू असतो.खुलेआम सुरू असलेल्या चक्री जुगार अड्ड्यावर कोणतेही कारवाई होत नसल्याने खालून वर पर्यंत सर्व पोलिस अधिकारी यांना सर्व कल्पना असल्याची बाब फलटणकर नागरिकांनी बोलून दाखवत असून नक्की या चक्री जुगार अड्यावर कोण व कधी कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- शहरातील गुन्हेगार अल्पवयीन मुलांचा अनेक गुन्ह्यात सहभाग वाढला असून अल्पवयीन मुले व्यसन, जुगाराच्या आहारी गेल्याने अनेक गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढला असून अशी अनेक मुले चक्री जुगाराच्या आहारी गेली आहेत. चक्री जुगाराच्या आहारापोटी विविध गुन्ह्यात वाढ होताना दिसत आहे.
- दिवाळीत फार मोठ्या प्रमाणात मटका तसेच चक्री व्यवसायात तेजी असते याची संधी साधून ऐन दिवाळीत नवीन चक्रीचे अड्डे सुरू झाले असून आगावू हप्त्याची रक्कम अदा करून नवीन चक्रीचे अड्डे सुरू करण्यास मूक संमती देण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.

