सात वर्षांच्या मुलीशी अश्लील कृत्य केल्याचा आरोप; संशयिताविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क

फलटण, दि. ७ जून २०२६ : फलटण तालुक्यातील एका गावात सात वर्षांच्या मुलीशी अश्लील कृत्य केल्याचा आरोप एका व्यक्तीवर करण्यात आला असून याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संशयित आरोपीच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला कामानिमित्त बाहेर गेल्या असताना त्यांची सात वर्षांची मुलगी घरी होती. दुपारच्या सुमारास महिला घरी परतल्यानंतर मुलगी रडत त्यांच्याकडे आली. त्यावेळी मुलीने शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने हाताने खुणावून घरात बोलावले व तिच्याशी अयोग्य वर्तन केल्याचे सांगितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

घडलेला प्रकार समजल्यानंतर महिलेने आपल्या पतीला याबाबत माहिती दिली. त्यानंतर दोघांनी मिळून संबंधित व्यक्तीविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत तक्रार दिली आहे.सदर घटना दि. ५ जून २०२६ रोजी दुपारी १२.३० ते १.०० वाजण्याच्या सुमारास घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलीसांनी तक्रार दाखल करून घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

error: Content is protected !!