फलटण बार असोसिएशनच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा उत्साहात सत्कार

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क

फलटण प्रतिनिधी : फलटण बार असोसिएशनच्या सन २०२६–२७ च्या कार्यकारिणीसाठी बिनविरोध निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपाध्यक्षपदी ॲड. मेघा अहिवळे, सहसचिवपदी ॲड. शारदा दीक्षित, खजिनदारपदी ॲड. शाम अहिवळे आणि कार्यकारिणी सदस्यपदी ॲड. रोहिणी भंडलकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

समारंभात फलटण बार असोसिएशनच्या सन्माननीय सदस्य ॲड. वर्षाराणी पिसे-राऊत यांच्या हस्ते उपाध्यक्ष ॲड. मेघा अहिवळे यांचा सत्कार करण्यात आला. ॲड. वंदना सुळ यांच्या हस्ते सहसचिव ॲड. शारदा दीक्षित तसेच कार्यकारिणी सदस्य ॲड. रोहिणी भंडलकर यांचा गौरव करण्यात आला. तर ॲड. पी. बी. देवकाते यांच्या हस्ते खजिनदार ॲड. शाम अहिवळे यांचा सत्कार करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी ॲड. राहुल मदने, ॲड. प्रशांत गावडे, ॲड. शंभू भोसले, ॲड. अक्षय सोनवलकर, ॲड. अर्जुन कोळेकर, ॲड. प्रबुद्ध मिसाळ, ॲड. शिंदे यांच्यासह फलटण बार असोसिएशनचे अनेक सदस्य व मान्यवर उपस्थित होते.नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी बार असोसिएशनची गौरवशाली परंपरा जपत वकिलांच्या हिताचे प्रश्न प्राधान्याने सोडविणे, संघटनेची एकजूट अधिक मजबूत करणे आणि सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

फलटण बार असोसिएशनच्या नव्या कार्यकारिणीतील सर्व पदाधिकाऱ्यांवर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

error: Content is protected !!